नागपूर

कुख्यात छोटा इब्राहिमचा झाला ‘गेम’; जुन्या वादातून केला खून

अनिल कांबळे

नागपूर : मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड छोटा इब्राहिम याचे यशोधरानगरातून तिघांनी अपहरण केले. त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. मृतदेह पोत्यात टाकून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. ही खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम खान ऊर्फ छोटा इब्राहिम (२२, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा) हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अर्धाडझन गुन्हे दाखल आहेत. त्याचा एका युवकाच्या हत्याकांडातही समावेश होता. पोलिसांनी छोटा इब्राहिमवर तडीपार आणि एमपीडीएची कारवाईसुद्धा केली होती.

दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी त्याला दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाही त्याला पकडले होते, परंतु तो पळून गेला होता. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी तो यशोधरानगरातील मित्राच्या घरी लपून बसला होता. तो चोरून-लपून मोमीनपुऱ्यात येत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी इब्राहिमबाबत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली नव्हती.

अपहरण करून केला खून

छोटी इब्राहिमचे आरोपी राशिद खान (रा. कामठी), शम्मी, सोनू ऊर्फ इमरान आणि अरबाज यांनी यशोधरानगरातून अपहरण केले. त्याला निजामुद्दीन कॉलनीतील एका ईटाभट्टीजवळ नेले. त्याच्यावर तलवार-चाकूने हल्ला केला. त्याच्या पोटातील आतड्या बाहेर काढल्यानंतर मृतहेद पोत्यात भरून कन्हानकडे नेण्यात आले.

तीन दिवसांपासून होता बेपत्ता

छोटा इब्राहिम याचे तीन दिवसांपूर्वीच चौघांनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्याच एका मित्राने पोलिसांना दिली. त्यावरून सोनू आणि शम्मूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी इब्राहिमचा खून करून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात मृतदेह फेकल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी इब्राहिमच्या कुटुंबीयांना कन्हानला नेले. पाण्यात दोन मृतदेह आढळले होते. त्यापैकी एक मृतदेह इब्राहिमचा असल्याचे स्पष्ट झाले. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली तर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT