टेकाडी ः घटनास्थळावर पंचनामा करताना कन्हान पोलिस. 
नागपूर

अरेरे! काय झाले होते "त्याला', की वृद्‌ध आईलाच निदर्यपणे संपविले...

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि.नागपूर) :  एका गुन्हयात हत्येची शिक्षा भोगून आलेल्या निदर्यी मुलाकडून वृद्ध मातेची हत्या केल्याची घटना शुक्रवारी(ता.1) दुपारी घडली. आरोपीने गुन्हा केल्यानंतर स्वतः पोलिसात आत्मसमर्पण केले. अटकेतील आरोपीचे नाव संजय मारोती मेश्राम (वय53, न्यू गोंडेगाव) तर मृत आईचे नाव निमोनाबाई मारोती मेश्राम (वय83) असे आहे.


भांडकुदळ स्वभावामुळे बदनाम
कन्हान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संजय हा एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातून एका वर्षापूर्वी सात वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला होता. 19जानेवारीला कन्हान पोलिसांच्या वाहनांची देखील आरोपीकडून तोडफोड करण्यात आली होती. तिथेच आरोपीने गावात एका अज्ञात पिता पुत्रावर प्रानघातक हल्ला केला होता. या सर्व प्रकारणासंदर्भात आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीतून सुटल्यानंतर आरोपी संजय हा पुन्हा गावात आला. परंतु घरी भांडणानंतर आरोपी पुन्हा गावातून निघून गेला होता.


पत्नी व मुलाशी नव्हते पटत
घटनेच्या चार दिवसाआधी कळमेश्वर पोलिसांना संचारबंदीत फिरत असलेला आढळल्याने आरोपी संजयला पोलिसांनी गावात आणून सोडले होते. गावातील त्याच्या घरी त्याची वृद्ध आई रहात होती. उगाच भांडण विकत घेण्याचा प्रकरणामुळे त्याचे कुटूंब त्याला जवळ करत नव्हते. संजयची पत्नी आणि मुलगादेखील त्याच्या या स्वभावामुळे त्याला सोडून भाड्याच्या घरात रहायचे. शुक्रवारी संजय मेश्राम याने वृद्ध आईला गावानजीक टेकाडी शिवारात आणून महामार्गाच्या पुलाखाली निर्जन स्थळावर नेऊन तिच्याच हातातील काठीने तिच्या डोक्‍यावर जबर मारहाण करून ठार केले. घटनेनंतर स्वतः कन्हान पोलिसात जाऊन आईला ठार केल्याची त्याने कबुली दिली. एएसआई राजेंद्र पाली, येशू जोसेफ, विशाल शंभरकर, वीरेंद्रसिंग चौधरी, मुकेश वाघाड़े, रवि चौधरी, मनोज जायसवाल आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले व पंचनामा करून वृद्ध महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक राकेश ओला, डीवायएसपी संजय पुज्जलवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीला आज कामठी न्यायालायत सादर केले असता नागपूर कारागृहात पाठविण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT