पाटणसावंगी : ट्रक चालकाचा खून केल्यानंतर पोलिसांनी अटक केलेला आरोपी क्‍लिनर.  
नागपूर

जेवणावरून झाला दोघांत वाद; क्‍लिनरने केला क्षणार्धात "खेळ खल्लास'

सकाळ वृत्तसेवा

पाटणसावंगी (जि.नागपूर) : उत्तरप्रदेशातील आजमगढ येथून केबल घेउन चेन्नइेला जात असताना रस्त्यात पाटणसावंगी येथे जेवण करण्याच्या उद्‌देशाने ट्रक चालक व क्‍लिनर दोघे थांबले. रात्री ढाब्यावर जेवत असताना त्यांच्यात जेवणावरून वाद झाला. चालकावर असलेल्या रागातून क्‍लिनरने थेट लोखंडी पान्हा चालकाच्या डोक्‍यावर हाणला आणि त्याचा "खेळ खल्लास' केल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाटणसावंगी येथील सद्‌भावना नगरजवळ घडली.

दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवासी
मृत चालकाचे नाव उदयनारायण मनोहर यादव(वय36, नागरिया, डाहानपूर, उत्तर प्रदेश)असे आहे. त्याच्याच ट्रकवरील आरोपी क्‍लीनर छोटू शिवनाथ प्रजापती (वय20, जहॉंपीर, आजमगढ, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. ट्रक (क्रमांक जीजे12 बीटी3206) आजमगड येथून चेन्नई येथे केबल ड्रम घेऊन जात असताना महामार्गावरील सद्‌भावना पाटणसावंगी येथील सर्व्हिस रोडवर सोमवारी ते दोघे जेवण करण्यासाठी थांबले. जेवण करीत असताना चालक व क्‍लिनर यांच्यात शाब्दिक वाद झाला. क्‍लीनरने रागाच्या भरात चालकाच्या डोक्‍यावर गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेल्या लोखंडी पाणा काढून चालक उदयनारायण यादव याच्या डोक्‍यावर हाणला. त्यानंतर क्‍लिनरने त्याला ट्रकखाली ढकलून ठार केले व आरोपी क्‍लिनर पसार झाला.

हेही वाचा : घर चालवावे की पिकावर खर्च करावा, शेतक-यांना पडला प्रश्‍न

महिलेला आढळला मृतदेह
मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान सद्‌भावना नगरासमोर असलेल्या ढाब्यावरील महिला रेखा पृथ्वीराज कश्‍यप (रा.पाटणसावंगी) यांना ट्रकचालक ट्रकच्या बाजूला मृतावस्थेत पडलेला दिसला. तिने स्थानिक पोलिस चौकीला माहिती दिली. रात्री आरोपी हा ढाब्यावर आल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आरोपीचा शोध घेऊन पाटणसावंगी टोल नाक्‍याजवळ त्याला पकडून अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस सहाय्यक निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?

SCROLL FOR NEXT