Murder of a woman in an immoral relationship Nagpur crime news
Murder of a woman in an immoral relationship Nagpur crime news 
नागपूर

नागपूर क्राईम : अनैतिक संबंधातून महिलेची हत्या?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वाठोडा परिसरात एका ३० ते ३२ वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. खून झालेल्या महिलेची ओळख वृत्त लिहीपर्यंत पटलेली नाही. महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता अनैतिक संबंधातून गळा आवळून खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी सायंकाळी वाठोड्यातील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरातील मोकळ्या मैदानात एका युवकाला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने वाठोडा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत महिलेच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते. त्यामुळे तिच्यावर अतिप्रसंग झाला का याचाही पोलिस तपास करीत आहेत.

१६ वर्षीय मुलीवर अत्याचार

मौदा तालुक्यातील नवेगाव (रेल्वे) येथील १६ वर्षीय मुलीवर विशाल मेश्राम (वय ३२) याने लैंगिक शोषण करून विनयभंग केला. मुलगी घरी असताना आरोपी घरात येऊन तोंड दाबले व दोन्ही हात बांधले जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ‘तू जर कुणाला सांगितले, तर तुझ्या भावाला ठार मारून टाकेन’, अशी धमकी मुलीला दिली, असे पीडिताच्या वडिलांनी सांगितले. आरोपी विशाल मेश्राम याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली.

पैशासाठी आजीवर चाकूहल्ला

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या नातवाने आजीवर चाकूहल्ला करीत गंभीर जखमी केले. योगेश ऊर्फ ढोकला गोवर्धन गायकवाड (२०, रा. पांडूरंगनगर, कळमना) असे आरोपी नातवाचे नाव आहे. तुळशीबाई गोवर्धन गायकवाड (७०) असे जखमी आजीचे नाव आहे. तुळशीबाईची मुलगी सरस्वती निर्मलकर आणि आरोपी नातू योगेश हे एकत्रच राहतात.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास योगेशला लग्नाला जायचे होते. त्यामुळे त्याने तुळशीबाईला पैसे मागितले. आता पैसे नाहीत. पेन्शन आली की नंतर देतो असे आजीने म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत योगेशने तुळशीबाईच्या डोक्यावर, मानेवर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT