Amar Kale  Esakal
नागपूर

Wardha Loksabha: अमर काळेंनी पंजा सोडत धरली तुतारी,वर्धा लोकसभेची मिळाली उमेदवारी; शरद पवारांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

वर्धा लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार अमर काळे यांनी काँग्रेसची साथ सोडत तुतारी हातात घेतली आहे. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

सकाळ डिजिटल टीम

Wardha Loksabha Amar Kale: वर्धा लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार अमर काळे महाविकास आघाडीचे उमेदवार होतील असे संकेत होते. मात्र, ते कोणत्या पक्षाककडून यावर चर्चा सुरू असताना त्यांना काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी धरत आपला प्रवेश निश्चित केला. पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

वर्धेत महायुतीकडून विद्यमान खासदार रामदास तडस आणि महाविकास आघाडीकडून आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांच्या थेट लढतीचे चित्र आहे. यात वंचित आघाडी आणि बसपाचे उमेदवार असतील.

उमेदवारीची घोषणा झाली त्यावेळी अमर काळे स्वतः तिथे हजर होते. ते येत्या दोन एप्रिलला नामांकन दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर रामदास तडस तीन एप्रिलला उमेदवारी दाखल करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

वर्धा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकरिता सुटल्याने येथे परंपरागत काँग्रेसचा उमेदवार राहणार नसल्याचे स्पष्ट झाले. अमर काळे आतापर्यंत काँग्रेसकडून आर्वी विधानसभा लढले आहेत. लोकसभेकरिता काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, जागा राष्ट्रवादीला गेल्याने त्यांना खुद्द शरद पवार यांनी दिल्लीला बोलावून राष्ट्रवादीकडून लढण्याची ऑफर दिली.

अमर काळे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून प्रवेशाबाबत परवानगी घेत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढण्याची तयारी केली आहे.

नाराजांच्या मनधरणीनंतर प्रवेश

अमर काळे यांनी शरद पवार यांच्या शब्दाला मान देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या होकाराने वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची चांगलीच नाराजी झाली.

यामुळे शरद पवार यांनी सर्वच वर्धा जिल्हास्तरीय नेत्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या होकारामुळे अमर काळे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, महासचिव अतुल वांदिले, किशोर माथनकर, अॅड. सुधीर कोठारी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT