Ajeet Parse share investment investigation 
नागपूर

Nagpur : अजित पारसेच्या शेअर गुंतवणुकीची होणार तपासणी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजला पोलिस देणार पत्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉक्टरला साडेचार कोटी रुपयाने गंडविणाऱ्या अजित पारसे यासंदर्भात रोज नवे खुलासे होत आहे. तपासात पोलिसांसमोर रोज नव्या बाबी येत असल्याचे दिसून येत आहे. त्याने शेअरमध्येही काही पैसे गुंतविल्याची माहिती बुधवारी समोर आली असून त्याचीही चौकशी पोलिस करणार असून त्याबाबत ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ला पत्र देणार असल्याची माहिती आहे.

अजित पारसे याने नेत्यांशी जवळीक साधून त्या माध्यमातून अनेकांना फसविल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्याने हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेलही केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अगोदरच सायबर सेलच्या माध्यमातून त्याचे मोबाइल आणि लॅपटॉपसह हार्डडिस्कची तपासणी करण्यात येत आहे.

त्यातून येत्या काळात बरेच काही निघण्याची शक्यता आहे. मात्र, अजित बारसे याने शेअर मार्केटमध्येही पैसे गुंतविल्याची माहिती आहे. सध्या तो आकडा कमी असला तरी, त्याने नेमका किती पैसा त्यात गुंतविला याबाबत पोलिस माहिती घेत आहेत, त्यासाठीच गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ला पत्र देत, इत्यंभूत माहिती घेण्यात येणार आहे.

दुसरीकडे आज तपासात आणखी एक नवा खुलासा झाला असून अजित पारसेच्या रागी फाऊंडेशनच्या खात्यात ५० ते ६० हजार रुपये आढळले असून या फाऊंडेशनच्या माध्यमातून भामटी येथे एक फ्लॅटही घेण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. आता पोलिस या फ्लॅटची तपासणी करणार असून त्यातून अनेक खुलासेही होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबत पोलिसांनी अजित पारसेच्या सीए कडून बॅलेन्स शिटही मागविली असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT