Blast 
नागपूर

Nagpur Blast: नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू, सात जण जखमी

Explosives Manufacturing Company: शहरात एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कार्तिक पुजारी

नागपूर- जिल्ह्यात एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये स्फोट झालाय. यात सात जण जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे.

माहितीनुसार, पाच कामगार मृत्युमुखी पडले आहेत. सातजण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील ठामणा येथे चारमुंडी नावाची स्फोटकं बनवणारी कंपनी आहे. याठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचे प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कोणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. स्फोटकं आतमध्ये असल्याने याची खबरदारी घेतली जात आहे. स्फोट कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण, कंपनीमध्ये सात ते आठ जण काम करत होते अशी माहिती आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गर्दी केली आहे. आमदार अनिल देशमुख याठिकाणी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : निर्मला सीतारामन किती वाजता बजेट सादर करणार? बजेट कुठे पाहता येईल? जाणून घ्या सर्व माहिती

IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम! विराट - रोहितलाही मागे टाकत T20I मध्ये रचला नवा इतिहास

PAK vs AUS: अरे हा फेकाड्या आहे! पाकिस्तानी गोलंदाजावर भडकला कॅमेरून ग्रीन, ICC ला दिसत नाही का? Video Viral

IND vs NZ, T20I: इशान किशनचं वादळ घोंगावलं! न्यूझीलंडविरुद्ध कोणालाच न जमलेला पराक्रम केला

Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

SCROLL FOR NEXT