Book sakal
नागपूर

नागपूर : साडेसहा कोटींची पुस्तके रद्दीत

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात.

मंगेश गोमासे

नागपूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांवर पुस्तकांपासून वंचित राहण्याची वेळ येते. असे असताना महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळ ‘बालभारती’च्या गोदामातील २०१२ ते २०१९ या सात वर्षांच्या काळातील तब्बल साडेसहा कोटींची पुस्तके रद्दीत गेल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले. विशेष म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक २ कोटी ६२ लाखांवर रुपयांची पुस्तके रद्दीत विकण्यात आली.

राज्यात दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाद्वारे बालभारतीकडून पुस्तकांची छपाई केली जाते. विशेष म्हणजे, त्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून नेमकी किती पुस्तकांची मागणी आहे, याची माहिती घेण्यात येते. त्यामुळे जेवढी मागणी त्या तुलनेत, पुस्तकांची छपाई होते. साधारणतः पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. प्रकाशनाद्वारे इयत्ता पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत.

अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीत बालभारतीच्या गेल्या काही वर्षांपासून पडून असलेल्या आणि वापरात नसलेली पाठ्यपुस्तके रद्दीत विक्रीसाठी काही महिन्यांपूर्वी निविदा काढली होती. पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल येथील गोदामांमधील पुस्तके विक्रीस काढण्यात आली. त्यावेळी रद्दी विकण्यावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान यापूर्वी छपाई झालेल्या जुन्या अभ्यासक्रमाची तसेच नवीन पाठ्यपुस्तकांची छपाई करताना मुद्रित दोष असलेल्या पुस्तकांची रद्दी विक्रीमध्ये समावेश असल्याचे बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आता मागील सात वर्षांमध्ये बालभारतीने तब्बल ६ कोटी ४० लाखांची पुस्तके रद्दीत गेल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा बालभारती पुस्तकांचे योग्य नियोजन करीत नसल्याचा सवाल उपस्थित होत आहे.

बालभारतीने २०१६-१७ या वर्षात सर्वाधिक म्हणजे २०९८ मे.टन वजनाची व २ कोटी ६२ लाख रुपये किमतीची रद्दी विकली होती. तर २०१८-१९ मध्ये सर्वात कमी म्हणजे ९०० मे.टन पुस्तकांची विक्री करण्यात आल्याचे अभय कोलारकर यांच्या माहिती अधिकारातून उघड झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून छापलेली पुस्तके वापराविना पडून ठेवून बालभारतीने आपले नुकसान का केले? असा प्रश्न उपस्थित होतो.

असा आहे तपशील

वर्ष - रुपयाची पुस्तके

२०१२-१३ - ७२,७६,९७७.००

२०१७-१७ - २,६२,१०,६००.००

२०१७-१८- १,५६,७१,२५४.७३

२०१९-२०- १,४८,३४,२२९.९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT