Nitin Gadkari Sakal
नागपूर

नागपूर - शहरातील अर्धवट कामे आधी पूर्ण करा - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नागपूर शहरातील प्रत्येक वस्तीत पाणी साचले असून शहरच तुंबल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर शहरातील प्रत्येक वस्तीत पाणी साचले असून शहरच तुंबल्याचे चित्र आहे.

नागपूर - शहरातील प्रत्येक वस्तीत पाणी साचले असून शहरच तुंबल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वीची अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण केली जात नसल्याने केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी आज महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच संतापले. नवीन कामे थांबवा, आधी अर्धवट कामे पूर्ण करा करून चिखल होणाऱ्या भागातील दुरुस्ती त्वरित करा, असे निर्देश त्यांनी महापालिका, नासुप्रला दिले. नव्या ड्रेनेज लाइनच्या जाळ्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश महापालिकेला देत निधीची तरतूद करून देतो, अशी ग्वाहीही दिली.

‘सकाळ’ने आज ‘अर्धवट कामांनी नाकी नऊ’ या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शहरातील पूरस्थितीचा आढावा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतला. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, एनडीआरएफचे रमेशकुमार, माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक दाभोळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सरदेशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. रस्ते बांधकाम करणाऱ्या मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपापल्या रस्त्यांची देखभाल करून तुंबलेले पाणी हटविण्याची जबाबदारी मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पार पाडायला हवी होती. परंतु गेल्या नऊ दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने गडकरी यांनी सर्वच संस्थांचे कान टोचले. लोखंडीपूल, घाटरोड, अजनी पूल या रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीतही खोळंबा झाला होता. नरेंद्रनगर पुलाखाली पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद होती. लोकांना अन्य मार्गांनी जावे लागले. या भागाची तपासणी व निरीक्षण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावे व पुढे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्या.

अकरा वर्षानंतरही पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ते अपूर्ण

सिमेंट रस्त्यांची पहिल्या टप्प्याची कामे २०११ ला सुरु झाली. आज २०२२ सुरु आहे. पण कामे पूर्ण झाली नाहीत, या वस्तुस्थितीकडे आमदार प्रवीण दटके यांनी गडकरींचे लक्ष वेधले. प्रकल्पांच्या कामासाठी पैसे आहेत. पण कामे पूर्ण केली जात नाहीत. अनेक रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले दिसून आल्याचेही आमदार दटके यांनी सांगितले.

नाल्यातील भूखंडाला नासुप्रने दिले आरएल

शहराच्या काही भागात विकासकांनी नाल्यातही भूखंड पाडून विकले. विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासने या भूखंडांना आरएलही दिल्याची बाब बैठकीत पुढे आली. नासुप्रच्या कळमना भागातील ले-आऊटमध्ये रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये पाणीच पाणी आहे. शहरातील एकही चेंबर चांगले नाही. त्यावर झाकणेही नाहीत, यावरूनही गडकरींनी नासुप्र, मनपाला धारेवर धरले.

प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे

शहरातील ड्रेनेज लाइन जुनी आहे; यंदा पाऊस अधिक झाला, असे उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. यावेळी गडकरी चांगलेच संतापले. त्यांनी ज्या विभागाच्या मालकीचे रस्ते आहेत, त्या विभागाची पाटी रस्त्यांवर लावण्यात यावी. तसेच कंत्राटदाराचे नाव व नंबरही त्यावर देण्यात यावे, असे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT