Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Crime: लग्नात नाचताना वाद... मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला कारमध्ये कोंडून मारहाण; तिघे अटकेत

लग्न समारंभात नाचत असताना झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचे ४ जणांनी अपहरण केले. त्याला आपल्या कारमध्ये कोंडून बेदम मारहाण करीत चालत्या वाहनातून खाली फेकले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: लग्न समारंभात नाचत असताना झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचे ४ जणांनी अपहरण केले. त्याला आपल्या कारमध्ये कोंडून बेदम मारहाण करीत चालत्या वाहनातून खाली फेकले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. करण दीपक कुऱ्हे (वय २५, रा. चिंतामणीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रथमेश विठ्ठलराव वानखेडे (वय २१), मनीष सुधाकर येलेवार (वय २४) आणि चेतन संजयराव कांबळे (वय २३, रा. कळंब, यवतमाळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एक साथीदार फरार आहे. रविवारी (ता.३) सायंकाळी ओंकारनगर येथील निलगिरी लॉन्स येथे लग्न होते.

लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना धक्काबुक्की केल्याने तरुणांनी एकमेकांना मारहाण केली. करणच्या मित्रालाही मारहाण करीत होते. त्यामुळेच त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रात्री करण लॉनमधून फिरायला गेला असताना अचानक आरोपी (एमएच४८-एसी६१६२) कारमधून पोहोचले. त्यांनी करणला जबरदस्तीने गाडीत नेले. आरोपींनी करणला कारच्या आत बेदम मारहाण केली. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ आरोपींनी करणला कारमधून फेकून दिले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT