‘संविधान पार्क’ sakal
नागपूर

Nagpur : ‘संविधान पार्क’चा तरी आदर ठेवा हो!

भारतीय संविधानाची ओळख प्रत्येकाला व्हावी या उदात्त हेतूने शहरातील रामनगर चौकातही लाखो रुपये खर्चून ‘संविधान पार्क’ची निर्मिती करण्यात आली.

Akhilesh Ganvir

अखिलेश गणवीर

रामनगर : नुकत्याच झालेल्या जी २० बैठकीनिमित्त एकीकडे शहर चकाचक करण्यात आले तर दुसरीकडे अतिशय विरोधाभासी चित्र आहे. भारतीय संविधानाची ओळख प्रत्येकाला व्हावी या उदात्त हेतूने शहरातील रामनगर चौकातही लाखो रुपये खर्चून ‘संविधान पार्क’ची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज या पार्कची अतिशय दयनीय अवस्था आहे.

संविधान पार्कच्या मागे लोकं लघुशंका करतात. रात्री प्रास्ताविकेच्या पुढे दारू ढोसली जाते. सध्या हा संपूर्ण परिसर कचरामय झालेला आहे. इतकेच नाही तर बाजूच्या भंगारवाल्यांनी भंगाराचे साहित्य ठेवले आहे. जी-२० साठी आलेल्या विदेशी पाहुण्यांना येथे आणले असते तर संविधानाच्या होत असलेल्या अवहेलनेमुळे त्यांचीही मान खाली गेली असती. अशी भीषण वास्तविकता संविधान प्रास्ताविकेची आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार सर्वकाही संविधानात अंगीकृत आहे. मात्र, नागरिकांनी याला फाटा देत संविधान प्रास्ताविकेला भंगार, कचरा आणि दारूत बुडविले. लोकशाहीची मूल्ये प्रत्येकात रुजावी यासाठी संविधान प्रास्ताविकेचे वाचन,

ओळख, संविधान दिन साजरा करणे आदी उपक्रम सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येतात. याच हेतूने तत्कालीन आमदार निधीतून महापालिकेने रामनगर चौकात ‘संविधान पार्क’ तयार केले. येथे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत संविधान प्रास्ताविकेची प्रतिकृती उभारण्यात आली. त्यासमोरच अशोक स्तंभही साकारण्यात आला आहे. गेट आणि लाईट्सची व्यवस्थासुद्धा आहे. मात्र, केवळ नावासाठी मोठमोठ्या वास्तू उभारून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मुतारी, दारूअड्ड्यामुळे नाराजी

संविधान प्रास्ताविका परिसरात रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वाच्या लोकांचे वास्तव्य असते. याच परिसरात दारू पितात. पार्कच्या मागे लघुशंकाही करतात. उष्टे अन्न तेथे फेकतात. जागोजागी घाण व कचरा साचलेला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

जी-२० मध्येही मनपाचे दुर्लक्षच

जनतेच्या पैशातून महापालिकेने उभारलेले ‘संविधान पार्क’ आज केवळ नावालाच उभे आहे. मागील तीन-चार वर्षांपासून याचे काम सुरू होते. लाखो रुपये खर्च करण्यात आले. पार्कचे काम पूर्ण होऊन जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला.

अद्याप याचे उद्‍घाटन करण्यात आलेले नाही. महापालिकेने जी-२० निमित्त शहर सजावटीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु एकीकडे मोठ्या प्रमाणात रोषणाई होत असताना दुसरीकडे संविधान पार्क परिसरात साधी स्वच्छताही करण्यात आली नाही.

जवळ जाऊनही दिसत नाही ‘संविधान पार्क’

रामनगर चौकात आल्यावर तुम्ही संविधान पार्क शोधाल तर तुम्हाला जवळ गेल्यावरही ते दिसणार नाही. सभोवताल अतिक्रमण वाढले आहे. महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी भला मोठा फलक लावण्यात आला. त्यामुळे संविधान पार्क दबले गेले. त्यासमोर फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. इतकेच नाही तर बाजूला असलेल्या भंगारवाल्याने आपले साहित्य तेथे ठेवले आहे. त्यामुळे जवळ जाऊनही संविधान पार्क दिसत नाही. महापालिकेने केलेला हा खर्च निव्वळ पाण्यात गेला.

आयुक्तांसह धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बांधकाम पूर्ण होऊनही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. रात्रीला लाईट लावले जात नाही. त्यामुळे असामाजिक तत्त्वाच्या लोकांचे चांगलेच फावते. सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना पोलिसांना दिसत नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. धरमपेठ झोनच्या प्रभाग १३ मध्ये हा परिसर येतो. महापालिका आयुक्तांसह धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक व्हावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT