nagpur sakal
नागपूर

Nagpur : कैसे करे मामा, क्यो करे ड्रामा...! ‘रॅप’मधून तरुणांनी टोचले नागपूरकरांचे कान

शहर आपलं सुधरलं, तुमी कवा सुधरानं...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘अबे सुधर जा..खर्रा खाके थुंकना नही...अबे सुधर जा...दिवारो पे मुतना नही...अबे सुधर जा...सिटी रखो क्लिन...रुकना नही...रुकना नही..’ या ‘रॅप’ गाण्यातून शहरातील विनोद वाघाडे व क्षितीज लोणारे या दोन तरुणांनी नागरिकांचे कान चांगलेच कान उपटले आहे.

नुकताच जी-२० निमित्त शहर सौंदर्यीकरण करण्यात आले. शहरात काही पुतळे व म्युरल बसविण्यात आले. परंतु नागरिक त्याची वाट लावत असल्याने ‘शहर आपलं सुधरलं, तुमी कवा सुधरानं...’ असा सवालही या तरुणांनी ‘रॅप’ गाण्यातून केला आहे.

शहरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधतानाच नागरिकांच्या बेताल वागणुकीवरही बोट ठेवणारे रॅप गाणे विनोद वाघाडे व क्षितिज लोणारे या दोघांनी लिहिले व स्वरसाजही चढविला आहे. अमर बागडे यांनी तरुणाईच्या पसंतीस पडलेल्या या रॅप गाण्याला संगीत दिले आहे.

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ धूम करतो आहे. नागपुरातच नव्हे तर शहराबाहेरही हे व्हिडीओ रॅप सॉंग अनेकांच्या पसंतीस पडले आहे. जी-२० निमित्त शहराचे सौंदर्यीकरण झाले. अनेक ठिकाणी नवे पुतळे, म्युरल तयार करण्यात आले.

परंतु नागरिकांनी या पुतळ्यावर बसून फोटो काढणे, रंगरंगोटी केलेल्या भिंतीवर लघुशंका करण्यासारखे प्रकार सुरू केले. जी-२० मुळे शहराचे नाव जगात गेले. मात्र, शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे.

नेमके यावर बोट ठेवणारे हे रॅप गाणे तयार करणारा विनोद वाघाडे हा उत्तम गायक आहे. त्याने यापूर्वी एका वाहिनीवरील गाण्याच्या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर केले होते. या कार्यक्रमात गायक, संगीतकार आदर्श शिंदे पंच होते. याशिवाय एका शोमध्ये त्याच्या गीताला १ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. २०१३ पासून गाणे लिहित असून त्याने लिहिलेल्या गीताला गायिका बेला शेंडे यांनी आवाज दिला आहे. पुढे कचरापेटी व पाण्याचे महत्त्व यावर रॅप गाणे तयार करीत असल्याचे विनोद वाघाडे यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले.

‘नागपूर का पोहा...’ला २० लाख लोकांचा प्रतिसाद

यापूर्वी ‘नागपूर का पोहा...’ या रॅप गाण्याने ओळख मिळवून दिली. हे गाणे २० लाख लोकांनी पाहिल्याचे विनोद वाघाडे म्हणाले. क्षितिज लोणारे हा मित्र गाण्यासंबंधी सर्व रणनिती तयार करतो, शुटिंगसाठी लोकेशन शोधतो. गेल्या दहा वर्षांपासून रॅप गाणे गात असल्याचे वाघाडे म्हणाले.

शहरात नुकताच घडलेल्या ताज्या घडामोडीवर रॅप सॉंग तयार करणे आवडते. जी-२० निमित्त शहराची सजावट करण्यात आली. परंतु नागरिक आता घाण करीत आहे. त्यांनी शहराला सुंदर ठेवावे, यासाठी हे रॅप सॉंग तयार करण्यात आले. सामाजिक कार्याचीही आवड असल्याने रॅपमधून नागरिकांना संदेश दिला.

- विनोद वाघाडे, गीतकार, गायक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT