Nagpur News  Esakal
नागपूर

Nagpur Crime: ६ वर्षीय चिमुकलीवर ६१ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, कोर्टाने सुनावली २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या ६१ वर्षीय नराधम वृद्धास सत्र न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे

सकाळ डिजिटल टीम

Court Sentenced 20 Years Jail to Physical Assaulters: सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या ६१ वर्षीय नराधम वृद्धास सत्र न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एडविन मायकल फ्रान्सिन (वय ५९, रा. सीमटाकळी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना ५ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. पीडित मुलगी आई, वडील व आजी सोबत भाड्याने राहत होती. आरोपी शेजारीच राहत असल्याने ओळख होती. पीडिता आरोपीला ‘बडेपापा’ नावाने हाक मारीत असे. काही कारणांस्तव आरोपीने ते घर सोडले व त्याच परिसरातील दुसरीकडे भाड्याने राहू लागला. (Latest Marathi News)

आई-वडील कामावर गेल्यावर मुलगी घरी आजीसोबत राहात असे. घटनेच्या दिवशी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुलगी चॉकलेट आणण्यासाठी जात होती. आरोपीने फ्रुटी घेऊन देतो, असे आमिष देऊन घरी घेऊन गेला व त्याने तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT