Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : ॲड. सतीश उकेसह सात जणांवर मोका; जमीन बळकावल्याचे प्रकरण...

विशेष म्हणजे, ईडीनेही त्यांच्या घराची तपासणी करीत, नोटीस बजावली होती.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपूर सुधार प्रन्यासची कोट्यावधी रुपयांची जागा फसवणूक करून आरोपींनी बळकावल्याप्रकरणी अजनी येथे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात आर्थिक गुन्हेशाखेने ॲड. सतीश उके याच्यासह सात जणांवर मंगळवारी (ता.१५) मोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला. यात त्याच्या भावांसह भावाच्या पत्नीचा समावेश आहे.

ॲड. सतीश उके, शेखर उके, मनोज सुभाष बघेल, चंद्रशेखर मते, प्रदीप उके, माधवी उके अशी आरोपींची नावे आहेत. काही वर्षांपूर्वी नागपूर सुधार प्रन्यास बाबुळखेड्यातील ४.० एकर जमीन बळकावत, त्यावर अनधिकृतपणे बांधकाम करीत त्या माध्यमातून सात कोटी रुपयांची जागा फसवणूक केल्याचा ठपका ठेवून नासुप्रचे अधिकारी पंकज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचा तपास काही दिवसांनी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला.

विशेष म्हणजे, ईडीनेही त्यांच्या घराची तपासणी करीत, नोटीस बजावली होती. दरम्यान, या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून आरोपींनी न्यायालयात धाव घेतली. त्यात न्यायालयाने आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ईडीच्या प्रकरणात सध्या अ‍ॅड. सतीश उके आणि प्रदीप उके हे आर्थर रोड कारागृहात आहेत. तर माधवी या प्रदीप यांच्या पत्नी होत. दरम्यान काल आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यावर याच प्रकरणात मोका दाखल करीत, कारवाई केली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT