नागपूर

Nagpur: फेसबुकवरून मैत्री करत घातली लग्नासाठी गळ, युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर मैत्रीणीला थेट लग्नासाठी गळ घालून तिच्या पाठलाग करीत विनयभंग करणाऱ्या २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime against: फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर मैत्रीणीला थेट लग्नासाठी गळ घालून तिच्या पाठलाग करीत विनयभंग करणाऱ्या २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली.
सचिन मनोज मुन (वय २०, रा. एमआयडीसी) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मजुरी करतो.

काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवर २० वर्षीय युवतीशी मैत्री झाली. मात्र, काहीच दिवसात त्याची वागणूक बघून युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर त्याने २२ डिसेंबरला युवतीचा पत्ता शोधून तिचा पाठलाग सुरू केला.

२३ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास युवतीला गाठून तिला लग्नासाठी मागणी घातली. याशिवाय लग्न न केल्यास तिला ठार करण्याची धमकी देत, शिवीगाळ करीत अश्‍लील कृत्य केले. त्यामुळे याविरोधात तिने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सचिन याला अटक केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : सरकार आपल्या प्राधान्यक्रमांना पूर्णपणे विसरले आहे - वारिस पठाण

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT