Nitin Gadkari  sakal
नागपूर

Nitin Gadkari : फेक पोस्ट प्रकरणी गडकरीं यांची पोलिसात तक्रार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करुन आक्षेपार्ह मजकूराची `फेक पोस्ट' समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करुन आक्षेपार्ह मजकूराची `फेक पोस्ट' समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे.

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करुन आक्षेपार्ह मजकूराची `फेक पोस्ट' समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. त्यामध्ये आपत्तीजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. ही गंभीर बाब आहे. गडकरी यांनी सुद्धा याप्रकरणाला गंर्भीयाने घेतले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यालयाकडून थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी तक्रारीद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नावे दत्तात्रय जोशी नावाच्या अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह मजकूर अनेक व्हॉट्सअँप ग्रूपवर पसरविण्यात आला. त्यात आक्षेपार्ह लिहिण्यात आले होते. त्या पोस्टमुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघण्याची शक्यता आहे. हा खोडसाळ प्रकार केल्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या कार्यालयात या 'फेक पोस्ट'बाबत माहिती मिळाली.

गडकरी यांच्या ट्वीटरवरून माहिती देऊन सदर 'व्हायरल पोस्ट' करणार्‍याविरुद्ध नागपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोस्ट प्रसारित करणार्‍यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. पोस्ट `फेक' असल्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. `ना. गडकरींच्या नावाची बदनामी करणारा मजकूर समाजमाध्यमांवर पसरविणार्‍याविरुद्ध तक्रार आली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे', अशी माहिती सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT