Saksham Tinkar sakal
नागपूर

Nagpur Crime : अल्पवयीन मुलांमध्ये भडकले टोळीयुद्ध एका युवकाची हत्या

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ वृत्तसेवा

Hingna News- महाविद्यालयातील गटातटाच्या भांडणाचे टोळीयुद्धात रुपांतर झालयाने बुटीबोरीतील एका युवकाची हत्या झाल्याची घटना हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिरूळ येथील सक्षम कैलास तिनकर (वय १७) असे मृतकाचे नाव आहे.

सक्षम तिनकर हा बुटीबेरीतील पियूसी सेंटरवर काम करीत होता. घटनेतील मुख्य आरोपी सौरभ ऊर्फ बादशाह पंधराम(१९),रा राजाराम नगर, वर्धा रोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो नेहमी वर्धा रोडवरील कॉलेजमध्ये यायचा. त्याला मुले भाई म्हणायचे.

काही दिवसांपूर्वी मृतकाच्या परिचयातील युवकांचे पावनभूमी परिसरातील विद्यार्थ्यांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर सौरभ हा त्याच्या मदतीला धावला होता. त्यानंतर काही अल्पवयीन मुलांनी समझोता करण्यास पुढाकार घेतला होता. चर्चा करण्यासाठी दोन्ही गटातील युवक डोंगरगाव येथे भेटायला आले.

पावनभूमी येथील युवकांनी सौरभलाही सोबत आणले होते. बुटीबोरीतील काही युवक आणि मुलेही निघाली होती. वाटेत पियुसी केंद्रावर मृतक सक्षम भेटला. त्याचा पूर्वीच्या या घटनेशी काही संबंध नसताना सुद्धा त्यालाही सहज म्हणून सोबत घेतले.

काही अंतर पळाल्यावर आरोपींनी सक्षमला पकडले आणि त्याच्यावर चाकूने आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला आणि पळून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सक्षमला एम्समध्ये दाखल केले पण रात्री साडेदहाला त्याचा मृत्यू झाला.

सक्षमच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सौरभ सह ५ विधिसंघर्ष बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या आणखी साथीदाराचा शोध सुरु आहे. पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग जाधव करीत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT