Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप

भाडेकरुशी अनैतिक संबंधाचा होता संशय

सकाळ डिजिटल टीम

Nagpur : पत्नीचे भाडेकरूशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमरराज मेश्राम (वय ३४) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पारशिवनी पोलिस ठाण्यामध्ये पत्नी सोनाली (वय ३०, रा. दोघेही गिट्टीखदान) हिच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल होता.

या प्रकरणी न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्णय दिला. ही घटना १० जानेवारी २०१७ रोजी घडली. आरोपी अमरराज याचे सोनालीशी लग्न झाले होते. ते गिट्टीखदान परिसरात राहत होते. जॉन गंगाधर बागपैजन नावाचा एक तरुण सोनालीच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहत असे. जॉन आणि सोनालीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अमरराजला होता. जॉनचे सोनालीच्या घरच्यांशी जवळचे संबंध होते.

त्याचे आधारकार्डसुद्धा सोनालीचे वडील गंगाधर बागपैजन यांच्याच नावाने बनविण्यात आले होते, असे पोलिसांनी या खटल्या दरम्यान सांगितले आहे. सोनाली ग्रामीण भागात नोकरी करीत असे. अमरराजने घटनेच्या दिवशी पत्नीला कामाला सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसविले. पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यात थांबून त्याने तिचा खून केला. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळून आला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेच्या दिवसापासून अमरराज बेपत्ता होता. पोलिसांनी त्याला हुडकून काढले. त्याला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीला दोषी ठरवित त्याला शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT