crime 
नागपूर

नागपुरात दादागिरी वाढली, वस्तीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुंडाने ओलांडली सीमा

सकाळवृत्तसेवा

नागपूर : वस्तीत वर्चस्व आणि दादागिरी दाखविण्यासाठी एका गुंडाने युवकाला जबर मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शांतीनगरात घडली. सागर खुशाल डाबरे (वय 26, रा. लालगंज) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरू गुणवंतराव चांदेकर (वय 32, रा. लालगंज) हा कुख्यात असून त्याचे परिसरात वर्चस्व आहे. तो दारूडा असून वस्तीत दादागिरी आणि धमक्‍या देण्यासाठी ओळखल्या जातो. सागर डाबरे हा वस्तीतील युवकांमध्ये चर्चीत आहे. त्याच्या स्वभावामुळे त्याला अनेक जण ओळखतात. हीच बाब आरोपी विरू याला खटकत होती.

जबर मारहाण करीत युवकाचा खून
सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सागर डाबरे हा वस्तीतील किराणा दुकानात जात होता. दरम्यान, आरोपी विरूने त्याला अडविले. "तू वस्तीबाहेर लोकांशी मैत्री करतो. त्यांना घेऊन बसतो.' एवढे म्हणून अश्‍लिल शिवीगाळ केली. त्यानंतर अचानक सागरवर हल्ला चढविला. सागरला विरूने जबर मारहाण केली. त्याच्या छातीवर आणि पोटावर लाथा-बुक्‍क्‍यांचा मार बसल्यामुळे तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला.

राहा सावधान! आजारापेक्षा अफवांचेच पेव 

त्याला परिसरातील नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती पाहता त्याला डॉक्‍टरांनी लगेच त्याला मेयोत दाखल करण्यात सांगितले. मेयोतील डॉक्‍टरांनी सागरला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी विकास सोनगर याच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी आरोपी विरू चांदेकर याच्याविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur : सख्ख्या भावाकडून अत्याचार, १३ वर्षीय बहीण २६ आठवड्यांची गर्भवती, हायकोर्टाची गर्भपाताला परवानगी

Ranji Trophy Final: जम्मू-काश्‍मीरच्या अजिंक्यपदाची औपचारिकता; पहिल्यावहिल्या रणजी करंडकाचे जेतेपद निश्‍चित

Latest Marathi News Live Update : कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक, पोलिसांनी पाठलाग करत केले जेरबंद

'अनिल कपूरसारखा नवरा नको!' माधुरी दीक्षितने दिलेलं स्पष्ट उत्तर, म्हणालेली... 'आम्ही फक्त...'

पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

SCROLL FOR NEXT