Nagpur  Esakal
नागपूर

Devendra Fadnavis: देशातील महिला पूर्ण करणार मोदींचं '४०० पार'चं स्वप्न, देवेंद्र फडणवीसांचा वर्ध्यात प्रचाराचा शंखनाद

देशातील महिला मोदींच्या ४०० पारच्या स्वप्नाला बळ देतील आणि देशाच्या विकासात आता खांद्याला खांदा लावून काम करतील. कारण येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार असतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis on Narendra Modi: मोदी सरकारने १० वर्षे केलेली विकास कामे ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत त्यांनी देशातील महिला मोदींच्या ४०० पारच्या स्वप्नाला बळ देतील आणि देशाच्या विकासात आता खांद्याला खांदा लावून काम करतील. कारण येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार असतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्धेत महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांचे नामांकन दाखल केल्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी विदेशात देशाचे नावलौकिक केले आहे. पूर्वी त्यांची लाट होती आता त्सुनामी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लोकसभेत ४०० पारचा नारा दिला आहे.

गरीबांसोबत असलेल्या मोदींना ते या निवडणुकीत सहज शक्य आहे. त्यांनी राबविलेल्या गरीब कल्याणाच्या एजंड्यातून त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गरीबांचा विकास केला आहे. २५ कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केले. मोदींनी राबविलेल्या योजनांमुळे भारत पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे. यातून आलेल्या पैशातून मोदी गरीब, आदिवासी, मागास समाजाचा विकास साधणारे आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी केवळ इंजन असलेली रेल्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुसाट असलेली विकास रेल्वे रोखण्याकरिता देशातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. यात असलेले नेते हे या रेल्वेचे इंजन आहेत. या रेल्वेत केवळ इंजन असून त्यात डब्बे नसल्याने ती कोणत्या दिशेने धावेल हे सांगणे कठीण आहे. उलट महायुतीच्या रेल्वेचे इंजन नरेंद्र मोदी आहे. या रेल्वेच्या डब्यात सर्वसामान्य बसलेले असल्याने ती रेल्वे विकासाच्या रुळावर धावणारी आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT