Music news esakal
नागपूर

Nagpur : दिग्गजांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट

दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळणार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नागपुरातील दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. निमित्त आहे मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नागपूर व श्री बाबूरावजी झाडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे.

शनिवार (दि. २२) ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता भाग्यश्री नगर, गोस्वामी डेअरीच्या मागे खरबी रोड याठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे ‘सकाळ माध्यम समूह’ माध्यम प्रायोजक आहे. तर भारतीताई नितीन झाडे, गोस्वामी डेअरी प्रॉडक्ट्स हे प्रायोजक आहेत.

दिपावली पहाट कार्यक्रमात नागपुरातील सुप्रसिध्द गायक सागर मधुमटके, गायक संजय पोटदुखे, गायक भूषण जाधव, गायिका गौरी शिंदे, गायिका पल्लवी कुंभारे व संच यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

नागपुरातील सुप्रसिद्ध गायक यांच्या सुमधुर भावभक्ती मराठी हिंदी गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज साल्पेकर करणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक हरिओम भद्रे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT