Nagpur Doctor rescued Mother and baby from death sakal
नागपूर

नागपूर : मृत्यूच्या दाढेतून मातेसह बाळाची सुटका!

मेडिकलमधील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न फळाला; धारणीतून केले होते नागपुरात रेफर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बाळाचा जन्म हा आई आणि तिच्या कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण असतो. बाळ सुखरूप जन्मल्यानंतर सगळ्यांच्या जिवात जीव येतो. मात्र, मेळघाटातील धारणी येथून मेडिकलमध्ये आलेल्या महिलेची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. हिमोग्लोबिन अवघे साडेसहा एवढेच होते. प्रसूतीच्या वेदनाही सहन होत नव्हत्या. बाळासह मातेच्या जिवाची जोखीम क्षणोक्षणी वाढत होती. पण मेडिकलच्या स्त्री व प्रसूतीरोग विभागातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत तिच्यासह बाळाला जीवदान दिले. २४ तासांत सुखरूप प्रसूती झाली अन् मातेच्या कुशीत बाळ विसावले.

मेळघाटमधील धारणी तालुक्यातील सागरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ललिता शिवकुमार दहिकर(वय २७)मेडिकलमध्ये रेफर केले. दोन मे रोजी सकाळी मेडिकलमध्ये आणले त्यावेळी तिचे हिमोग्लोबिन अवघे साडेसहावर आले होते तर २४ हजाराच्या घरात प्लेटलेट्स होत्या. यामुळे तिची शुद्ध हरवली होती. गर्भवती असताना आहारापासून वंचित राहिल्याने ती कुपोषित राहिली. गर्भातच बाळाचा जीव धोक्यात होता.

मृत्यूच्या दाढेतून मातेसह बाळाची सुटका!

मेडिकलच्या युनिट क्रमांक पाचमधील डॉक्टरांनी दोन रक्त युनिटसह प्लेटलेट्स वाढवण्यात काम काही तासांत केले. प्रसूतीसाठी ललिता सक्षम झाल्याचे दिसताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. माता आणि गर्भातील बाळाचा जीव वाचविला. ते दोघेही २४ तासांपासून डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत. युनिट पाचचे प्रमुख डॉ.अनिल हुमणे यांच्यासह वैद्यकीय पथकाचे कौतुक अधिष्ठातांकडून कौतुक करण्यात आले.

मातेच्या कुशीत विसावले बाळ...

ललिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर देवदूत म्हणून धावून आले. त्याचप्रमाणे मेडिकलमधील सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सुरेखा ताटेवार यांचे मोलाचे योगदान मिळाले. येथील स्त्री व प्रसूतीरोग विभागप्रमुख डॉ. जितेंद्र देशमुख यांनी रक्ताची गरज असल्याचे ताटेवार यांना सांगितले. सुरेखा ताटेवार यांनी कार्यालयात येण्यापूर्वीच घरूनच रक्त आणि प्लेटलेट्सची जुळवाजुळव केली. यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करताना मदत झाली. ताटेवार यांच्याप्रमाणे मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मुरारी सिंग यांचीही शस्त्रक्रियेसाठी मोलाची मदत मिळाली.

मेळघाटात मुख्यत्वे कुपोषणामुळे येथील मातांमध्ये रक्तक्षय दिसून येतो. जन्म देणारी माताच कुपोषित असल्याने जन्मलेले बाळ कुपोषित असते. मेडिकलमध्ये स्त्री व प्रसुतीरोग तसेच बालरोग विभागातील डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने मातेसह चिमुकल्याचा जीव वाचला.

- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT