Chicken masala 
नागपूर

ऑनलाईन बोलवलेले चिकन खाल्ल्याने युवा अभियंत्याचा मृत्यू ? वाचा सविस्तर 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय नागरिकांची जीवनशैली आधुनिक झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तू आता घरोघरी ऑनलाईन पोहोचू लागल्या आहेत. वेळ आणि श्रम वाचविण्याच्या उद्देशाने या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागपुरात एक वेगळीच घटना पुढे आली आहे.

ऑनलाईन बोलावलेले चिकन खाल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना लक्ष्मीनगरमधील आठरस्ता चौकात घडली. विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. या अभियंत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज ताकसांडे हा सॉफ्टवेअर अभियंता होता. तो पत्नी पूजासोबत आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहायचा. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन बोलाविले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तेथून बाहेर येताच तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विराज याला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

येथील डॉक्‍टरांनी त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी विराज याला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर विराजला मृत घोषित केले. वृत्त लिहिपर्यंत विराज याचे शवविच्छेदन झाले नव्हते. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT