Nagpur exam online examination board Decision
Nagpur exam online examination board Decision sakal
नागपूर

नागपूर : अखेर परीक्षा ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक गुरूवारी घेण्यात आली. यामध्ये परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्याचे ठरले. त्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

विद्यापीठाद्वारे २५ एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र, एमकेसीएलद्वारे विद्यार्थ्यांच्या अर्जात तांत्रिक चुका आढळल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढविली होती. त्यातूनच अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय वेळापत्रक लांबल्याने अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातूनच परीक्षेबाबत आजच्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान प्रशासनाकडून सर्व बाबींचा विचार करीत, परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरले. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ती ऑफलाइन पद्धतीने द्यायची आहे, त्यांनाही त्या पद्धतीने देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. त्यनुसार बहुपर्यायी प्रश्‍नावर (एमसीक्यू) आधारीत परीक्षा घेण्यात येणार आहे.

१५ मे नंतर परीक्षा

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाद्वारे १५ नंतर ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० जूनपर्यंत परीक्षा संपविण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि व्हायवा ठरल्याप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थी संघटनांनी केली होती आंदोलने

विशेष म्हणजे ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत होती. याप्रश्‍नावर विद्यापीठाबाहेर अनेकवेळा आंदोलने झाली. या शैक्षणिक सत्रातील बहुतांश अभ्यास ऑनलाइन झाल्याचा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला. अशा स्थितीत विद्यापीठाची परीक्षा ऑफलाइन घेणे योग्य नाही. जोपर्यंत संपूर्ण सत्र ऑफलाइन होत नाही तोपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. विद्यापीठाच्या निर्णयामुळे एकीकडे विद्यार्थी संघटनांचा विजय झाला असून दुसरीकडे पुन्हा एकदा ऑनलाइन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT