Nagpur  Sakal
नागपूर

Nagpur : शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम! जंगली डुकरांचा हैदोस, पेरलेले बियाणे केले फस्त

त्यामुळे दुबार पेरणी करावी लागू नये म्हणून या परिसरातील शेतकरी रात्रीला कुठल्याही धोक्याची पर्वा न करता उघड्या जमिनीवर जागरण करून रात्र घालवीत आहेत.

मोहन गायन

Nagpur - चिखलदरा तालुक्यातील जामली परिसरात यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली. मात्र जंगली डुकरे पेरणी केलेला मका बियाणे खाऊन फस्त करीत आहेत. या डुकरांपासून बियाणे वाचविण्यासाठी शेतकरी शेतात जागली करीत आहेत.

शेतकरी दरवर्षी सोयाबीनची पेरणी करायचे, पण या पिकाला आता पाहिजे त्याप्रमाणात झडती मिळत नसल्याने शेतकरी मका पिकाकडे वळले. मका हे पीक सोपे आणि कमी खर्चात येत असून एकरी २० क्विंटल उत्पन्न मिळते.

तसेच मक्याला साधारण २००० रुपयांचे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी मका पिकाची महागडे बियाणे आणून टोबणी केली, पण जंगली डुकरे टोबलेले बियाणे एकाच रात्री खाऊन फस्त करीत आहेत.

त्यामुळे दुबार पेरणी करावी लागू नये म्हणून या परिसरातील शेतकरी रात्रीला कुठल्याही धोक्याची पर्वा न करता उघड्या जमिनीवर जागरण करून रात्र घालवीत आहेत.तरी वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

बंदोबस्त करण्याची मागणी

रात्रीला डुकराचे कळप शेकडोच्या संख्येने फिरतात व मक्याचे पीक शोधतात. शेतकऱ्यांनी शेतात जागरण न केल्यास अख्खे पीकच उखडून काढतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT