Nagpur Fire News 
नागपूर

Nagpur Fire: शेकोटीमुळं झोपडीला आग! दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

आग लागली तेव्हा घरात या मुलांव्यतिरिक्त मोठी माणसं कोणीही नव्हतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : रात्रीच्यावेळी थंडीचा कडाका वाढल्यानं शेकोटी पेटवल्यानं घराला आग लागल्याची घटना नागपूर शहरात घडली आहे. या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. (Nagpur Fire incident a hut caught fire due to bonfire death of two children)

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, या आगीत देवांश रणजित उके (वय ७) आणि प्रभास रणजीत उके (वय २) या दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हजारी पहाड सेमिनरी हिल परिसरात ही घटना घडली.

गुरुवारी रात्री साडे 9 ते 10 वाजताच्या सुमारास उके कुटुंबाच्या झोपडीला आग लागली. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे, त्या समोरच ही झोपडी आहे. (Latest Marathi News)

मुलांनी घरातच पेटवली शेकोटी?

या झोपडीत तीन भावंड होती आग लागल्यानं मोठी मुलगी ओरडत बाहेर आल्यानं ती बचावली. थंडी असल्यानं या मुलांनी घरातचं शेकोटी पेटवली, ज्यामुळं आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी या मुलांची आई शेजारी गेली होती तर वडील कामाला गेले होते. या घटनेनंतर आईनं आरडाओरडा सुरु केल्यानं शेजारचे लोक मदतीसाठी धावले मात्र, तोपर्यंत आगीनं उग्र रूप धारण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT