Forest Guard Recruitment  Esakal
नागपूर

Forest Guard Recruitment: सरकारी नोकरीचं स्वप्न, जीव तोडून धावला...वनरक्षक भरतीत धावण्याची चाचणी देताना तरुणाचा मृत्यू

नागपूर वनवृत्तातर्फे वनरक्षकाच्या भरतीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी सचिन दिलीप लांबट (वय २८) याचा धावण्याची चाचणी देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

Boys Died in Forest Guard Recruitment Physical Test: नागपूर वनवृत्तातर्फे वनरक्षकाच्या भरतीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी सचिन दिलीप लांबट (वय २८) याचा धावण्याची चाचणी देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. शासकीय नोकरीचे स्वप्न घेऊन घरून निघालेल्या या तरुणाचे स्वप्न अर्धावरच मोडले. या युवकाचा मृत्यू कसा झाला याचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे.


नागपूर वनवृत्तातर्फे ४० हजार पेक्षा अधिक वनरक्षकांची धावण्याची चाचणी घेण्यात आली. सोमवारी (ता.४) अंतिम चाचणी होती. त्यानुसार तयारीही करण्यात आली होती. सकाळी वनरक्षकांच्या भरतीत सहभागी झालेल्यांची धावण्याची चाचणी सुरू झाली. फिनिश लाईनच्या जवळ आल्यानंतर सचिनला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला, काही काळानंतर तो पुन्हा उठला आणि धावण्यास सुरुवात केली.

मात्र तातडीने इतर उमेदवारांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सायंकाळनंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. वन विभागाने तातडीने त्याच्या आई-वडिलांनाही नागपुरात बोलावून घेतले. अचानक रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची अचानकच किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वनविभागाचे अधिकारीही युवकाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. (Latest Marathi News)

सचिनची परिस्थिती हलाखीची होती. वडील शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. सचिनने शासकीय नोकरी मिळवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. वणी येथे राहून दररोज शासकीय मैदानावर सराव करून अभ्यासिका केंद्रात अभ्यास करीत होता. नागपूर वनवृत्ताने घेतलेल्या वनरक्षकांच्या लेखी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

त्यामुळे त्याची धावण्याची चाचणी सोमवारी घेण्याचे निश्चित झाले होते. २१ आणि २२ फेब्रुवारीला नागपुरात धावण्याची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे चार मार्चला पुन्हा चाचणीसाठी बोलविण्यात आले. सचिन निर्धारित अंतर पूर्ण करण्यासाठी धावत असताना अचानकच पडला. पुन्हा उठला आणि धावायला लागल्याने त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भरती केले. तब्येतीत सुधारणा होत असताना अचानक रात्री अकरा वाजता किडनी निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT