Nagpur Green Gym Esakal
नागपूर

Nagpur Green Gym: ग्रीन जिमची चौकशी सुरू, १२ कोटींच्या खर्चात २०० गावांत उभारल्या जाणार होत्या जिम

जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानमधून लावण्यात आलेल्या ग्रीन जिमची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कल्पना इखार यांनी काही तालुक्यांमधील ग्रीन जिमची प्रत्यक्ष पाहणी केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur : जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानमधून लावण्यात आलेल्या ग्रीन जिमची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कल्पना इखार यांनी काही तालुक्यांमधील ग्रीन जिमची प्रत्यक्ष पाहणी केली.

खनिज प्रतिष्ठानमधून जिल्ह्यात २०० गावांमध्ये ग्रीन जिम लावण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटींवर खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये जिमचे साहित्य लावण्यात आले. परंतु ग्रीन जिमचा विषय सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. खनिज प्रतिष्ठानच्या कौशल्य विकास लेखाशीर्ष अंतर्गत ग्रीन जिम मंजूर करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

ग्रीन जिमचे साहित्य महागडे खरेदी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून लावलेले जिमचे साहित्य तुलनेत कमी रुपयांचे असल्याचा मुद्दा सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत उपस्थित करीत याच्या चौकशीची मागणी केली होती. जिमचे साहित्य गावाच्या बाहेर लावण्यात आल्याचाही आरोप सदस्यांचा होता.

त्यानंतर अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी समितीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर याच्या चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून समिती गठित करण्यात आली. यात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता व तीन जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच काही जिमची पाहणी केली. त्यांच्यासोबत एक उपअभियंताही होता. त्यांच्याकडून लवकरच चौकशी अहवाल येण्याची अपेक्षा आहे. (Latest Marathi News)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यात लावलेल्या साहित्यासाठी देयक अदा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. परंतु अद्याप देयके अदा करण्यात आले नाही. विशेष या प्रकरणात केंद्राच्या एका पथकाने येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT