Nagpur hsc result 2022 Urvi Mitesh Tulsi top in city
Nagpur hsc result 2022 Urvi Mitesh Tulsi top in city sakal
नागपूर

नागपूर : उर्वी, मितेश, तुलसी शहरात टॉप

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या बारावीच्या निकालात नागपूरच्या सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजची वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी उर्वी शहा हिने सर्वाधिक ९७.८३ टक्के गुण मिळवले आहेत. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी मितेश प्रशांत वांढरे याने विज्ञान शाखेत ९७.५ टक्के गुण मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तसेच एलएडी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तुलसी चौधरी हिने कला शाखेत सर्वाधिक ९४.८३ टक्के गुण मिळवले आहेत.

बुधवारी दुपारी १ वाजता निकालाची घोषणा करण्यात आली. निकाल पाहण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान निकालात यावर्षी सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने बाजी मारली. कला शाखेत सातत्य राखत एलएडी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यश मिळविले. बऱ्याच शाळांनी निकालाची शंभरी गाठली असून त्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले आहे.

सीए होण्याचे स्वप्न : उर्वी

कोरोनासारख्या महामारीत ऑनलाइन शिक्षण घेत असताना अनेक समस्या आल्या. मात्र, डोकं शांत ठेवून अभ्यासावर लक्ष दिले. दररोज दोन तास अभ्यास आणि नियमित सरावाने हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया वाणिज्य शाखेत ९७.८५ टक्क्यासह शहरातून प्रथम आलेल्या सेंट पॉल शाळेतील विद्यार्थिनीने दिली. नियमित अभ्यास यशाची गुरूकिल्ली असल्याचे ती म्हणाली.

अभियांत्रिकीत करिअर : मितेश

भविष्यात काय बनायचे आहे ही दिशा निश्‍चित करून त्या दिशेने प्रवास केल्यास यश तुमच्या पाठीशी असते. माझ्या यशात सराव परीक्षांचा मोठा सहभाग आहे. शिक्षकांनीही सराव परीक्षेत मोलाचे मार्गदर्शन केले.आयआयटीला प्रवेश मिळविणे हे पुढील लक्ष्य आहे. यादृष्टीने तयारी करत असल्याचे मत मितेश वांढरे याने व्यक्त केले. मितेश शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मितेशचे वडील प्रशांत वांढरे हे एलआयसीमध्ये कार्यरत आहेत.

प्रशासकीय सेवेत जाणार : तुलसी

कला शाखेत ९४.८३ टक्क्यासह प्रथम आलेल्या एलएडी महाविद्यालयातील तुलसी चौधरीने अॅथलेटिक्समध्येही नाव कमावले आहे. ती राज्य सुवर्णपदक विजेती असून राष्ट्रीय स्पर्धेतही तिने भाग घेतला आहे. त्याचे वडील चंद्रशेखर चौधरी हे शहरातील विज्ञान संस्थेत शिक्षक आहेत. तर माता छाया चौधरी या गृहिणी आहेत. तुलसीने तिच्यासाठी अॅथलेटिक्स असल्याचे सांगितले. त्याच्याबरोबर अभ्यासासाठी वेळ काढणे कठीण होते. मात्र, तरीही ऑनलाइन अभ्यासासोबतच स्वयंअभ्यासाच्या मदतीने परीक्षेत कला यश संपादन केले आहे. पण माझे लक्ष्य प्रशासकीय सेवेत जाण्याचे असल्याचे तुलसीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT