नागपूर sakal
नागपूर

Nagpur : आय...लव्ह...यू...नागपूर ! सौंदर्यीकरण, रोषणाईच्या प्रेमात पडले नागरिक

झाडांवर केलेली रंगबिरंगी आकर्षक रोषणाई, पथदिव्यांची आरास

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिव्हिल लाईन्स परिसरातील आकर्षक रोषणाईतून जाताना नकळतपणे तरुणाईच्या ओठातून ‘आय...लव्ह...यू...नागपूर’ हे शब्द बाहेर पडत आहे.

झाडांवर केलेली रंगबिरंगी आकर्षक रोषणाई, पथदिव्यांची आरास अन् हिरवळीवर फोटोसेशनसाठी केलेल्या गर्दीमुळे नागपूरकर पुन्हा एकदा शहराच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे.

जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शहराचा संपूर्ण कायापलट करण्यात आला आहे. वर्धा मार्ग, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडील रस्ते जणू कार्निवल असल्यासारखे झगमगाटात न्हाऊन गेले आहे. आता या रस्त्यांवरील रंगबिरंगी रोषणाई, पथदिव्यांनी उजळलेल्या

आय...लव्ह...यू...नागपूर !

रस्त्यांची नागपूरकरांना भुरळ पडली आहे. रोषणाईत झाडांच्या पानांचा बदलत असलेला रंग, आकर्षक फुलांच्या झाडावर पडलेली श्वेत प्रकाशाची किरणे, लॉन गवतावर दवबिंदुप्रमाणे असलेल्या पाण्याच्या थेंबातून चकाकणारे विद्युत दिवे,

या सर्वांनी नागपूरकरांना अक्षरशः वेड लावले आहे. वर्धा मार्ग, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडील रामगिरी व इतर भागात नागरिक फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. अनेक जण कुटुंबीयांसह फोटो काढण्यासाठी या मार्गावर येत आहेत. त्यामुळे सिव्हिल लाईन्ससारख्या रात्री वर्दळ नसलेल्या भागातही गर्दी होत आहे.

मोबाईलच नव्हे तर अनेकजण कॅमेरे घेऊन येथे फोटोसेशनसाठी येत आहे. विमानतळ परिसरातही नागरिक कारने फोटो काढण्यासाठी जात असल्याने शनिवारी रात्री वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली.

अखेर पोलिसांना काही नागरिकांना परत पाठवावे लागले. वर्धा मार्गावर मेट्रोच्या पिलरवर करण्यात आलेली रोषणाई नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. एकूणच एवढे सुंदर नागपूर कधी बघितले नाही, असे शब्द आपसूक ओठातून बाहेर पडत आहे. जी-२० निमित्त का होईना, परंतु नागपूरचे हे आकर्षक रुप पुढील अनेक वर्षे नागरिकांच्या स्मरणात कायम राहील, असे एका नागरिकाने नमूद केले.

प्री-वेडिंग फोटोशूटही

शहरातील आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवर नुकताच लग्न जुडलेले तरुण-तरुणी प्री-वेडिंग फोटो शूट करतानाही दिसून येत आहे. विशेषतः विमानतळ व सिव्हिल लाईन्स येथील भागात काही तरुण-तरुणीने प्री-वेडिंग फोटो शूट केल्याचे अनेकांनी बघितले. शहरात केलेली आकर्षक रोषणाई कायम राहावी, असे मतही काही तरुणांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Tilekarwadi Post Office Record: टिळेकरवाडीला नवे पोस्ट ऑफिस; आठ दिवसांत १०११ खाती उघडून विक्रमी कामगिरी

SCROLL FOR NEXT