nagpur imporvement trust dismissal decision cancel by mahavikas aghadi government 
नागपूर

महाविकास आघाडीचा तत्कालीन फडणवीस सरकारला दणका, 'नासुप्र' बरखास्तीचा निर्णय रद्द

राजेश चरपे

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने गेल्या भाजप सरकारला आणखी एक दणका दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप सरकारने नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीचा निर्णय घेतला होता. तोच निर्णय महाविकास आघाडीने फिरविला. त्यामुळे प्रन्यास पुनर्जीवित होणार असून पूर्वीच्या सात योजना आणि गुंठेवारी योजना प्रन्यासमार्फत राबवण्यात येणार आहे. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी प्रदान करण्यात आली. 

भाजपच्या कार्यकाळात २०१६ आणि १९ या वर्षी प्रन्यास बरखास्तीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या दरम्यान महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली होती. सुधार प्रन्यासची संपत्ती आणि मालमत्तेच्या वाटणीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सात योजना महापालिकेला हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. सुधार प्रन्यास अधिनियमातील संबंधित कलमामध्ये सुधारणारुपी कायद्यातील बदल अस्तित्वात न आल्याने, नागपूर सुधार प्रन्यास ही संस्था अंतिमतः बरखास्त करण्याची कारवाई प्रत्यक्ष झाली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्य विधिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने निर्णय कालबाह्य ठरला. त्यामुळे तो अखेर रद्द करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

Nalkehda Car Accident : रात्रीच्या अंधारात भाविकांवर काळाचा घाला! पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT