Nagpur Inflation non vegetarian chicken feed price increase sakal
नागपूर

नागपूर : मांसाहारप्रेमींना महागाईच्या झळा

औषधी, खाद्य, वाहतूक दरवाढीचा बसला फटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंधन दरवाढ, कोंबडीच्या खाद्यात झालेल्या दरवाढीमुळे चिकन आणि मटण महाग झाले आहे. मटणाचे दर वाढल्याने मांसाहारप्रेमी चिकनकडे वळले होते. मात्र, आता चिकनचे भावही वधारले आहेत. त्यामुळे मांसाहार करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नसल्याचे जिभेला आवर घालण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

विदर्भात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्रीचालकांना मोठा फटका बसला होता. अनेकांना फुकटात कोंबड्या वाटप कराव्या लागल्या. मात्र, दीड वर्षापूर्वी हेच दर १२० ते १४० रुपये प्रती किलोपर्यंत होते. आता चिकनचे दर दुप्पट झाले आहेत.

२५० ते २७० रुपये प्रतिकिलो दराने चिकनची विक्री होत आहे. कोरोन काळात बाजारात चिकनच्या दरात मोठी घट झाली होती. पूर्वी ८० ते ९० रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज १२० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे चिकनची २६० ते २८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. वाढत्या उन्हामुळे कोंबड्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अजून दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गावरानचे दर वाढले

बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकनच्या (जिवंत कोंबडा) दरातही वाढ झालेली आहे. पूर्वी ५५० ते ६०० रुपये किलो दराने विक्री होत होती. त्यातही १०० ते १ रुपये किलोमागे वाढ झालेली आहे. हैदराबादी कोंबडीचे दर ३२० रुपये किलो असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जानेवारीपासून अंड्याचे भाव कमी झालेले आहे. सध्या उत्पादन कमी झालेले असले तरी ठोक बाजारात प्रति नग अंडे चार रुपयावर आलेला आहे. किरकोळ बाजारात प्रति नग पाच रुपये विकले जात आहे. अंड्याचे दर कमी असताना किरकोळ विक्रेत्यांकडून वाढलेल्या दरातच अंड्यांची विक्री केली जात आहे.

सोहेल बशीर खान, संचालक सुविधा एग्ज

पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, औषधी, वाहतूक, वाढलेल्या किमतीमुळे चिकनचे दर वाढले आहेत. खाद्याचे दर दुप्पट झाले असल्याने पक्ष्यांचा सांभाळ करण्यास १०५ ते ११० ते रुपयांपर्यंत खर्च येतो आहे. उन्ह वाढल्याने कोंबड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्याचाही खर्च वाढलेला आहे.

- सुधीर दुद्दलवार, संचालक, पोल्ट्री फॉर्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT