Nagpur Leader of Opposition Ajit Pawar statement to activists 
नागपूर

नागपूर : काम असेल तरच भेटायला येत चला...

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना फटकारले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘काही काम असेल तरच भेटायला येत चला. उगाच टाईमपास करू नका’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फटकारले. कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात लक्ष घालण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अजित पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊन परतल्यानंतर शुक्रवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान त्यांना भेटायला पदाधिकारी व कार्यकर्ते रविभवन येथे गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटायचे असल्याचे सांगून वेळ मागितली होती. सकाळी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना दादांनी चांगलेच धारेवर धरले. उठसूठ नेत्यांच्या मागे फिरत जाऊ नका. त्यापेक्षा आपल्या प्रभागात लक्ष घाला.

नागरिकांच्या भेटीगाठी घ्या आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लाग, अशा शब्दात सुनावले. नेत्यांच्या मागे लागून टाईमपास करीत जाऊ नका.महत्त्वाचे काम असेल तर जरुर भेटा, असेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांचा खमक्या स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. रिकामटेकड्यांना ते समोर उभेही करीत नाहीत. हे माहिती असतानाही अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले होते. भेटीचे कारण काय? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. कार्यकर्त्यांना कुठलेही काम नव्हते आणि ते सहज भेटायला आले हे लक्षात आल्यानंतर पवारांनी सर्वांनाच खडे बोल सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT