टाळेबंदीच्या पूर्वसंध्येला ग्राहकांनी कपड्यासह इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी तुफान गर्दी मुख्य बाजारात केली. त्यामुळे शहरातील इतवारी, महाग, सक्करदरा, धरमपेठ, सदर, गांधी बाग, सीताबर्डीत वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र होते. 
नागपूर

Nagpur Lockdown: टाळेबंदीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

राजेश रामपूरकर

नागपूर ः कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आजपासून (ता.५) ते ३० एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला . जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पूर्वसंध्येला ग्राहकांनी कपड्यासह इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी तुफान गर्दी मुख्य बाजारात केली. त्यामुळे शहरातील इतवारी, महाग, सक्करदरा, धरमपेठ, सदर, गांधी बाग, सीताबर्डीत वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र होते.

टाळेबंदीच्या २५ दिवसांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवांना सूट दिली आहे. दारू ऑनलाइन मिळणार असली तरी काळजीत पडलेले मद्यप्रेमींनी आपला कोटा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी दारूच्या दुकानांसमोर गर्दी केली होती. सर्वत्र लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या होत्या. 

दरम्यान, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. सप्टेंबरच्या मध्यातील उच्चांकानंतर गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख चढा असताना मृत्यूची आकडेवारीही वाढते आहे. त्यामुळेच प्रशासनाने त्यावर निर्बंध आणण्यासाठी पुन्हा एकदा टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे सायंकाळी शासकीय आणि खासगी कार्यालये सुटल्यानंतर ग्राहकांनी बाजार फुलला होता.

सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. काही दुकानांमध्ये आवश्यक तेवढे सामाजिक अंतर पाळण्यात येत होते. मात्र, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत होती. आवश्यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच अनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.

व्यापार संपण्याची भीती

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून सलग सहा महिने टाळेबंदी लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झालेली आहे. लहान, मोठे उद्योजक व व्यावसायिक नियमित खर्चही भागणे कठीण झालेले असताना आता पुन्हा टाळेबंदी लागू केलेली आहे. यामुळे शहरातील व्यापार संपण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया एनव्हीसीसीचे उपाध्यक्ष फारुक अकबानी यांनी व्यक्त केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT