request 
नागपूर

माझे चोरलेले पैसे परत कर रे बाबा, अन्यथा आत्महत्या करावी लागेल.. अन् चोराने...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सायबर गुन्हेगाराने एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून रक्कम उडवली की ती परत मिळणे अशक्य बाब आहे. असा प्रकार घडल्यानंतर साधारणतः आपण पोलिसांना कळवतो व त्यांच्या तपासावर अवलंबून राहतो. मात्र नागपुरातील एका व्यक्तीसोबत जे घडले त्यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. या व्यक्तीने चक्क चोराला फोन करून आपली आर्थिक परिस्थिती सांगितली. अखेर चोरालाही पाझर फुटला.

लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेले प्रमोद सिंह त्यांच्या मालवाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकचा फास्टॅग रिन्यू करत असताना त्यांच्या बॅंक अकाउंटमधून चोरट्यांनी 15 हजार दुसऱ्या अकाउंटमध्ये वळवून घेतले. प्रमोद सिंह यांना एका बॅंकेची फास्टॅग रिन्यू करण्याची खोटी लिंक ऑनलाईन पाठवून त्यांचे सर्व बॅंकिंग डिटेल्स मिळविले. नंतर एका दुसऱ्या लिंकने प्रमोद यांच्या मोबाईलला काही वेळासाठी हँग करून बँक अकाउंटमध्ये असलेले सर्व म्हणजेच 15 हजार रुपये लंपास केले.

लॉकडाउनच्या काळात वाहन घरासमोर उभे असताना बँकेचे हफ्ते थकण्याची भीती असताना 15 हजार गमावल्यामुळे प्रमोद सिंह दुःखी होते. त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर प्रमोद यांनी स्वतःच चोरांना जाब विचारण्याचे ठरवले. पुन्हा त्याच नंबरवर कॉल करणे सुरू केले. अनेक कॉल केल्यानंतरही समोरून कोणतेही उत्तर आले नाही. मात्र, चोरट्यांनी चोरलेले 15 हजार रुपये, जीवन मरणाचा प्रश्न असल्याने प्रमोद यांनीही चोरांचा पिच्छा सोडला नाही. सतत कॉल करत राहिले. अखेरीस चोराने कॉल उचलला आणि प्रमोद सिंह यांनी आपली व्यथा सांगत चोरांना चांगलेच सुनावले. आणि हंबरडाच फोडला.

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण

प्रमोद सिंह यांची व्यथा आणि त्यांचं रडणं ऐकून अखेर चोरांनाही पाझर फुटला. त्यांनी ही प्रमोद यांना धीर देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. खरोखर फोन ठेवताच प्रमोद सिंह यांच्या बॅंक अकाउंटमध्ये चोराने त्यांच्या अकॉउंटमधून 5 हजार आणि  3 हजार असे आठ हजार रुपये परत पाठवले होते. खात्यात परत आलेले पैसे बघून प्रमोद यांना आनंद झाला. चोर आणि प्रमोद यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी चोराला आलेल्या दयेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT