Nagpur Marathi News Hospital had not undergone a fire audit, the Chief Minister ordered an immediate inquiry 
नागपूर

काय सांगता! रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेच नव्हते, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेेवा

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयात १० नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना काल मध्यरात्रीनंतर घडली. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झाले नसल्याची माहिती हाती येत आहे.

या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. 

काल मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेने अनेक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि प्रणालीवर अनेक प्रश्‍न उभे केले आहेत. जिल्हा रुग्णालयाचं फायर ऑडिट झाले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे. फायर ॲाडिट का करण्यात आले नाही, इलेक्ट्रिकल ऑडिट का झाले नाही आणि त्या वॅार्डात २४ तास परिचारिका होती का, असे एक ना अनेक प्रश्‍न या घटनेने उभे केले आहेत. अतिशय धक्कादायक आणि दुःखद माहिती आज सकाळीच हाती आली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना कळताच त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT