dasara festival esakal
नागपूर

Nagpur : दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू खातोय भाव

स्थिरावलेला झेंडू फुलांचा दर वाढला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्थिरावलेला झेंडू फुलांचा दर वाढून १०० रुपये किलो झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे. गेली दोन महिने सतत झालेल्या पावसाचा फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे. मागणीपेक्षा २० ते २५ टक्के आवक कमी असल्याने झेंडू फुलांचे भाव चढे आहे.

सततच्या पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली. परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही. सध्या बाजारात नांदेड, उस्मानाबाद, विदर्भातील इतर शहरे, शिवणी आणि छिंदवाडा येथून झेंडूच्या फुलांची आवक सुरू झालेली आहे. सध्या १२०० ते १५०० किलो भरती असलेल्या ६० ते ७० गाड्या भरून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत कमी आहे.

''पितृ पंधरवाड्यात झेंडूचा प्रतिकिलो बाजारभाव ३० ते ४० रुपये होता. नवरात्रीत ५० ते ६० रुपये बाजारभाव होता. मंगळवारी (ता.४) १०० रुपये बाजारभावाने घाऊक बाजारात झेंडूची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात १५०ते १६० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. सर्वच फुलांचे बाजारभाव वाढल्याने ग्राहकही मोठ्या माळांऐवजी लहान आकाराच्या माळाला पसंती देत आहेत. सद्यःस्थितीत फुलांचे बाजारभाव चढे राहतील.'' असे फूल विक्रेते जयंत नितनवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT