नागपूर

मेडिकल कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहात रॅगिंग! आरोग्य विद्यापीठाला पालकांकडून निनावी तक्रार, विद्यार्थीनींचा घुमजाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मुलींच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Medical College Ragging Cases: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मुलींच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार केली. सोमवारी (ता. ८) रॅगिंग विरोधी समितीच्या बैठकीत मात्र वसतिगृहातील मुलींना विचारणा केली असता, सर्व मुलींनी रॅगिंग झालीच नाही, असे सांगत घुमजाव केले.

अमृत महोत्सवानिमित्त मेडिकलमध्ये विविधरंगी कार्यक्रम सुरू होते. तर दुसरीकडे येथील विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पालकांनी केली. दरवर्षी एमबीबीएस, इंटर्नशिप किंवा एमडीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिगची एकतरी ऑनलाइन तक्रार मेडिकलमधून होते.

यावेळी मेडिकलमधील मुलींच्या वसतिगृह क्रमांक २ मधील मुलींच्या पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे (नाशिक) १८ डिसेंबर २०२३ दरम्यान रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार केली. १ जानेवारीला मेडिकल प्रशासनाकडे तक्रार वर्ग केली. त्यानुसार सोमवारी रॅगिंग विरोधी समितीची बैठक झाली. वसतिगृह क्रमांकामधील मुलींना या बैठकीत बोलावण्यात आले. मात्र सर्व मुलींनी रॅगिंग झालीच नाही, असे सांगितले. दरम्यान समितीकडून मुलींपुढे विविध पर्याय ठेवण्यात आले. संबंधितांवर कारवाईचे, नाव गुप्त ठेवण्याबाबतचे आश्वासन दिले. परंतु कुणीही पुढे आले नाही.

मागील वर्षी काय झाले?

मेडिकलमध्ये २०२२ मध्ये इंटर्नशिप करणाऱ्या सहा जणांना वसतिगृहातून बाहेर काढून त्यांची इंटर्नशिप रद्द केली होती.

गतवर्षीचा इतिहास

यापूर्वी मेडिकलच्या वसतिगृहात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार दिल्लीतील ॲन्टी रॅगिंग समितीच्या मदत क्रमांकावर करण्यात आली होती. तक्रार वर्ग होताच प्रशासनाकडून चौकशी केली. वसतिगृह क्रमांक ५ मध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मान खाली घालून उभे करणे, रात्री-बेरात्री मुलांना झोपेतून उठवून त्रास देण्यात येत असल्याचे नमूद होते.

२० सप्टेंबर २०२३ रोजी ॲन्टी रॅगिंग समितीची बैठकीत १०७ वरिष्ठ विद्यार्थी आणि ८२ एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची चौकशी केली गेली. चौकशीत विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाली नसल्याचे लेखी दिले होते. मात्र पुढील काळात मानसिक दडपणाखाली असलेल्या एका मुलाने एमबीबीएस अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द केला असल्याची जोरदार चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय- पॉपस्टार, इतक्या लाखांचं मिळालं बक्षीस

Sangli Vishal Patil : “कट्टर हिंदुत्व दाखवून सत्ता मिळवायची खेळी; पडळकरांचा राजकीय मुखवटा खासदार विशाल पाटीलांनी फाडला!”

Latest Marathi News Live Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

Malvan News : नीलेश राणेंनी उघड केलेली रोकड थेट कोषागारात जमा; निवडणूक प्रक्रियेत नवी खळबळ

Mumbai News: घरांच्या मालमत्ता करमाफीचा आर्थिक फटका, पाणीपट्टीही बंद; महापालिकेला २०० कोटींचा तोटा!

SCROLL FOR NEXT