Nagpur municipal corporation created Covid-19 app 
नागपूर

#COVID-19 आयुक्‍त तुकाराम मुंढे नेहमी एक पाऊल पुढे, हे आहे कारण....

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूने जगभरात आतंक माजविला आहे. चीनपासून इटली व अमेरिकेपर्यंत असे अनेक विकसित देश कोरोनामुळे हैराण झाले आहेत. जगभरात अद्यात 8,58,916 नागरिकांना या विषाणूची लाग झाली आहे. तसेच 42,158 नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. याच कारणामुळे आपल्या देशात लाकडाऊन सुरू करण्यात आले आहे. अशावेळी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफकेअर कंपनीच्या मदतीने 'COVID-19 App'ची निर्मिती केली आहे. नागपूर मनपाने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकल्याने "जे नागपूर मनपाला जमले ते राज्याला का जमू नये?' असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. 

देशातील कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. यात आता ऍपचाही समावेश करण्यात आला आहे. ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. ऍपमध्ये काही प्रश्‍न विचारण्यात आले असून, त्यानुसार संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्‍लिक करावे. सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-19ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्‍टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्‍टर संबंधितांशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील, असे आयुक्‍तांनी सांगितले.

ऍपचा उपयोग कशासाठी?

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील नागरिकांसाठी "कोव्हिड-19' हे ऍप तयार केले. या ऍपद्वारे ताप, कोरडा खोकला व श्‍वास घेण्यास त्रास असणाऱ्या रुग्णांपर्यंत डॉक्‍टारांना पोहोचता येणार आहे. यासाठी फक्‍त ऍपवर विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. हे ऍप 72 तासांनंतर गुगल स्टोअरवर उपलब्ध होणार असून, ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन आयुक्‍तांनी केले आहे. सध्या या ऍपची लिंक व्हॉट्‌सअपद्वारे व्हायरल करण्यात येत आहे. 

असा करा ऍप डाऊनलोड

'कोव्हिड-19' ऍप डाऊनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1abB97jEnkrzvIzcOY0eebr_wcQ8tT_sJ/view?usp=drivesdk या लिंकवर क्‍लिक करावी. हे ऍप फक्त कोव्हिड-19ची लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्‍वास घेण्यास त्रास असणाऱ्या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर ऍपचा वापर करू नये, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. 

डॉक्‍टरांना आणणार घरापर्यंत

14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी खासगी डॉक्‍टरांनी टाळेबंदी करून घरीच राहणे पसंत केले आहे. अशापरिस्थितीत जर लोकांना कोरोनाची लक्षणे असतील आणि मनपाच्या डॉक्‍टरांना दाखवायचे असेल तर पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जावे लागेल. मात्र, आपल्या हातात असलेला मोबाईल जर डॉक्‍टरांना आपल्यापर्यंत आणत असेल तर करोनाला रोखण्यात मदतच होऊ शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT