representative image e sakal
नागपूर

उपद्रव शोधपथकाने काढली ‘वरात’! ५० हजारांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या वर्गवारीतील डेल्टा प्लसच्या (delta plus variant of corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने (nagpur municipal corporation) शहरात सोमवारपासून निर्बंध आणखी कठोर करीत लग्न समारंभासाठी केवळ १०० जणांना परवानगी दिली. महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वऱ्‍हाडी मंडळींना आज उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाईचा धक्का दिला. चार लग्न समारंभांवर कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. (nagpur municipal corporation fine on people who violate corona rules)

लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात कोविड नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लग्नसमारंभांवर लक्ष केंद्रित केले. नंदनवन येथे मास्क न घातलेल्या नवरदेवाला दंड ठोठावला होता. त्यानंतर आजपासून नव्या कठोर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार मंगल कार्यालयातील लग्न समारंभात महापालिकेचे उपद्रव शोधपथक धडकले. धंतोली झोनंतर्गत सुयोगनगरातील रंजना सेलिब्रेशन हॉल, चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात १०० पेक्षा जास्त पाहुणे आढळून आले. हनुमाननगर झोनंतर्गत मार्कंडेय सभागृह, नेहरूनगर झोनमधील कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहातही परवानगीपेक्षा जास्त पाहुणे आढळले. या तिन्ही झोनच्या उपद्रव शोधपथकांनी सभागृह संचालक तसेच घरमालकावर प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे रंजना सेलिब्रेशन हॉलमध्ये सभागृह संचालक व कुटुंबप्रमुख या दोघांवरही प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

७० मंगल कार्यालयांची तपासणी -

उपद्रव शोधपथकाने आज ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोधपथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे संपूर्ण शहरातील मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT