nagpur municipal corporation neglect corona in slum area  
नागपूर

झोपडपट्ट्यांमध्ये हजारो कोरोनाबाधित; महापालिकेचे दुर्लक्ष, बाधितांचा मुक्त संचार

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील कोरोनाच्या उद्रेकाने झोपडपट्ट्याही कवेत घेतल्या आहेत. परंतु, महापालिकेकडून झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझेशन होत नाहीच शिवाय येथील नागरिकांना कुठलेही मार्गदर्शन, सुविधा मिळत नसल्याचेही पुढे आले आहे. विशेष म्हणजे जनजागृतीअभावी तसेच कोरोना झाल्यानंतर काय करावे, याबाबत काहीच माहिती नसल्याने झोपडपट्टीतील हजारो बाधित मुक्त संचार करीत असून ते उपचारापासूनही दूरच आहेत. 

शहरात ४२६ अधिकृत झोपडपट्ट्या असून यातील काही आता झोपडपट्ट्यांसारख्या दिसत नाही. मात्र, अद्यापही दोनशेपर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये मजूर, कामगार, फुटपाथवर साहित्य विक्रेते असे गरीब नागरिक वास्तव्यास आहे. काम केल्याशिवाय दोन वेळचे जेवणही मिळत नाही, असे नागरिक वास्तव्यास आहे. जवळपास चार लाखांवर नागरिक या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाने पाय पसरवले. हिंगणा रोडवरील राजीव गांधीनगर झोपडपट्टीमध्ये घरोघरी बाधित रुग्ण असल्याची माहिती या परिसरातील एका नागरिकाने दिली. विशेष म्हणजे हे नागरिक मुक्त संचार करीत आहेत. कुणी बिनधास्तपणे कामावर जात आहे, तर कुणी त्यांचा फुटपाथवर व्यवसाय करीत आहे. 

या वस्तीत एका घराआड बाधित आहेत किंवा कोरोनाचे लक्षणे आहेत. परंतु, बाधित असल्याचे सांगितल्यास काम हातचे जाईल अन् कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, या भीतीने कुणी ही बाब स्पष्ट होऊ देत नसल्याचे समजते. अशी स्थिती उत्तर नागपुरातील वनदेवीनगर, मार्टिननगर, पश्चिम नागपुरातील पांढराबोडी, मध्य नागपुरातील बांगलादेश, नाईक तलाव या वस्त्यांमध्ये दिसून येत आहे. या वस्त्यांचा कुठलाही डाटा महापालिकेकडे नाही. या वस्त्यांमध्ये साधे सॅनिटायझेशन केले जात नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आले होते. या वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्या होत्या. आता महापालिकेने या वस्त्यांतील नागरिकांना तसेच बाधितांनाही वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. 

लोकप्रतिनिधीही गायब -
झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना अद्यापही कोरोना झाल्यास कुणाशी संपर्क करावा, उपचारासाठी काय करावे, याबाबत जाणीव नाही. या लोकांत जनजागृतीसाठी नगरसेवक पर्याय आहे. परंतु, अनेकदा बैठकीत जनजागृती करण्याच्या वल्गना करणारे नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी या काळात गायब आहेत. परिणामी झोपडपट्‍टीवासीय चाचण्या व लसीकरणापासूनही वंचित असल्याचे या परिसरातील एका नागरिकाने नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT