nagpur municipal corporation will take action against who not pay arrears  
नागपूर

नागरिकांनो! महापालिकेची थकबाकी भरलीय का? मालमत्ता लवकरच लिलावात

राजेश प्रायकर

नागपूर : मोठा गाजावाजा करीत दोन महिने राबविण्यात आलेल्या अभय योजनेकडे थकबाकीदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. ३ लाख ७३ हजार थकबाकीदारांपैकी केवळ ५० हजार ५४८ थकबाकीदारांनी थकीत रक्कम जमा केली. यातून एकूण थकबाकीच्या केवळ दहा टक्के रक्कमच महापालिकेच्या तिजोरीत आली. 

मालमत्ता कराची अनेक वर्षांपासूनच थकबाकी चारशे कोटी रुपये आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने १५ डिसेंबर ते १४ फेब्रुवारीपर्यंत अभय योजना राबविली. परंतु, थकबाकीदारांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही. दोन महिन्यात चारशे कोटी थकीत रकमेपैकी केवळ ४३.८८ कोटी रुपये मनपाला मिळाले. त्यामुळे आता महापालिकेने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचे तसेच त्या लिलावात काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे काम सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. १५ डिसेंबर २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास दंडाच्या रकमेत ८० टक्के तर २१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. परंतु, नागरिकांनी त्याकडेही पाठ फिरवली. मात्र, या अभय योजनेमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १७ कोटींनी अधिक वसुली झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता करातून महापालिकेला २१४ कोटी ५४ लाख रुपये मिळाले. मागील वर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत १९७ कोटी ५१ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. पाणी करातून मागील वर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत १२१ कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. यात यंदा वाढ झाली आहे. यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत १३५ कोटी रुपयांचा पाणी कर वसुल करण्यात आला. पाणी कर अभय योजना संपण्यास अद्याप सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आणि थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. 

झोननिहाय थकबाकीदार व रक्कम - 

           झोन          थकबाकीदारांची संख्या वसुली (रुपये कोटींमध्ये) 

  • लक्ष्मीनगर ६,२१२ ५.६८ 
  • धरमपेठ" ३,४६८ ३.४१ 
  • हनुमाननगर ५,९८२ ५.०७ 
  • धंतोली १,८२८ १.६६ 
  • नेहरूनगर ७,३५६ ५.२६ 
  • गांधीबाग २,८६५ २१.३३ 
  • सतरंजीपुरा ३,८५४ २.६४ 
  • लकडगंज ६,२०६ ५.४८ 
  • आशीनगर ६,७१६ ५.३३ 
  • मंगळवारी ६,०६७ ६.९८ 
  • एकूण    ५०,५४८ ४३.८८ 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Gemini AI Saree Trend Alert: जेमिनी नॅनो बनाना AI साडीचा ट्रेंड फॉलो करताना व्हा अलर्ट, व्हिडिओ शेअर करत महिलेने समोर आणला धक्कादायक प्रकार

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ब्रेक अप के बाद! हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन अभिनेत्री; Jasmin Walia सह नातं संपलं? Mahieka Sharma ची आयुष्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT