Congress esakal
नागपूर

कॉँग्रेस उमेदवार शोधून ठेवणार; महापालिका निवडणुकीची तयारी

मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता

राजेश चरपे

नागपूर : वेळेवर शोधाशोध आणि कापाकापी करण्यापेक्षा काँग्रेसने आतापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार शोधून ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय समीकरणे बघून उमेदवारी जाहीर करण्यात येईल.

महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेतली. बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश महासचिव आमदार अभिजित वंजारी, उत्तर भारतीय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, व्यापारी व उद्योग सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रदेश सचिव संजय महाकाळाकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. दीडशेंपैकी फक्त २९ उमेदवार निवडून आले होते. नेत्यांमधील अंतर्गत भांडणे, उमेदवारी वेळेवर जाहीर केल्याने उडालेला गोंधळ व त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवर झालेली शाईफेक याचा मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील वर्चस्व काँग्रेसने मोडून काढले.

तत्पूर्वी, प्रभाग रचना, बूथ रचना, उमेदवारांची निवड यावरही चर्चा झाली. शहराचा प्रभागाचा आराखडा अद्याप जाहीर व्हायचा आहे. असे असले तरी आतापासून संघटनात्मक बांधणी आणि बूथ कमिट्या स्थापन करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लावावे असेही बैठकीत ठरले.

काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपविरोधात सर्वत्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. मात्र, आपसातील भांडणांमुळे नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. बैठकीत निवडणूक कशी लढायची, जातीय व राजकीय समीकरण कसे ठरवायचे, सर्व नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देऊन समतोल कसा साधायचा यावरही चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT