Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation sakal
नागपूर

Nagpur : आयुक्तांकडून अंदाजपत्रक जाहीर ; ३ हजार ३३६ कोटींच्या उत्पन्नाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करवाढ टाळून नागपूरकरांना दिलासा दिला.सोबतच वेळेत ऑनलाइन देयके भरल्यास व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा यंत्र, कचऱ्याचे घरीच कंपोस्ट खत तयार केल्यास करात पाच टक्के सवलतही मिळणार आहे.

अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ८१ कोटींची तरतूद केली आहे. पुढील तीन वर्षात शहरात ९०० कोटींचे रस्ते तयार करण्याचे नियोजन असून आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या किरकोळ समस्या सोडविण्यासाठी झोन कार्यालयांना प्रत्येकी अडीच कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी २०२३-२४ या वर्षासाठी ३ हजार ३३६ कोटींच्या उत्पन्नाचा संकल्प मांडला. पुढील वर्षात विविध विकासकामे व नियोजित खर्च, असा एकूण ३ हजार २६७ कोटी ६३ लाख रुपये खर्च होईल. पुढील वर्षात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरणावर भर दिला आहे.

आरोग्यासाठी ८१ कोटींची तरतूद केली असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. कोरोनानंतर साथरोगांवर नियंत्रणासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाचपावली सूतिकागृहामध्ये सिकलसेलसाठी अनुसंधान केंद्र उभारण्यात येणार असून आतापर्यंत २८ प्राथमिक आरोग्य केंद्र होते, ती संख्या ५१ पर्यंत गेली

असून येत्या काळात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून २० मोहल्ला क्लिनिक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सिमेंट रस्ता १, २, ३ असे टप्पे झाले. आता सिमेंट रस्ता ४, ५ व ६ असे टप्पे घेण्यात येणार असून प्रत्येकी तीनशे कोटींचे हे टप्पे आहेत. पुढील तीन वर्षांत ९०० कोटी ४० किमीच्या सिमेंट रस्त्यांसाठी खर्च करण्याचे नियोजनही त्यांनी स्पष्ट केले.

इतर सुविधा

शाळांमधील सुविधांसाठी ः २ कोटी

वाचनालयांसाठी ः ८.६० कोटी

मोकाट श्वानांसाठी डॉग शेल्टर ः १ कोटी

पाचपावली, गंजीपेठ अग्निशमन केंद्रासाठी २५ कोटी

७२ मीटर उंच हायड्रोलिक लॅडर ः ६ कोटी

इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट प्रणाली ः १९७ कोटींचा प्रकल्प (राज्य सरकारकडे प्रस्ताव)

गड्डीगोदाम येथे कत्तलखान्याचे नूतनीकरण ः ४ कोटी

अपेक्षित उत्पन्न

मालमत्ता कर ः ३०० कोटी

पाणी कर ः २१० कोटी

बाजार विभाग ः १५ कोटी

जाहिरात विभाग ः २७.७१ कोटी

जीएसटी, इतर अनुदान व नगररचना, स्थावर विभाग ः २७८४.१३ कोटी

पर्यावरणावर भर

६६ एकरात गोरेवाडा येथे अर्बन पार्क

उद्यानांचे नूतनीकरण

प्रदूषण रोखण्यासाठी दुभाजकांवर झाडे

४० हजार झाडे लावणार

जाफरनगरात रोपवाटिका

जूनपर्यंत १४४ ईलेक्ट्रिक बस येणार, त्यानंतर

२५० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

पावणेपाच कोटीतून शहराच्या चारही बाजूने विसर्जन कुंड

सफाई कर्मचाऱ्यांची काळजी

मनपाच्या सफाई कर्मचारी अनेकदा सिवेज चेंबरमध्ये उतरून जोखमीची कामे करतात. या कर्मचाऱ्यांचा विमा महापालिका काढणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंंतर्गत मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी १२०० घरे तयार करण्यात येणार आहे. वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT