nagpur
nagpur  esakal
नागपूर

Nagpur News : नागपूरकरांच्या आरोग्याला ११३ केंद्रांचा ‘बूस्ट’

राजेश प्रायकर -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने नागपुरात ११३ हेल्थ वेलनेस सेंटरला मंजुरी दिली असून नागपूरकरांच्या आरोग्याला ‘बूस्ट’ मिळणार आहे. या वर्षात महापालिका एकूण २० सेंटर सुरू करणार आहे. यापैकी चार सेंटर सुरू करण्यात आले असून १६ सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षात ९३ सेंटर सुरू करण्यात येणार असून यासाठी जागा निश्चित करण्यात येत आहे.

या सेंटरसाठी झोपडपट्टी परिसराला प्राधान्य देण्यात येणार असल्याने या भागात वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढणार आहे. शहरात महापालिकेच्या रुग्णालयांसोबतच ४८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) सुरू असून तीन लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक यूपीएचसी परिसरात दोन केंद्र सुरू करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने शहरासाठी ११३ केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी रामटेकेनगरातील राहाटे टोली, गोरले लेआऊट, झिंगाबाई टाकळी परिसरात रोजनगर, लकडगंज परिसरात श्यामनगरात केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नागपूरकरांच्या आरोग्याला ११३ केंद्रांचा ‘बूस्ट’

उर्वरित १६ हेल्थ वेलनेस सेंटरची कामे प्रगतीपथावर आहे. या सेंटरसाठी शासनाकडून १ डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एक सफाई कर्मचारी, अशी नेमणूक करण्यात येणार आहे. येथील देखभाल आणि दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. हेल्थ वेलनेस सेंटरसाठी झोपडपट्टी परिसराला प्राधान्य देण्यात येणार असून येथील नागरिकांना माफक दरात उपचार मिळणार आहे.

बॉक्स..

निःशुल्क रक्त तपासणी

महापालिकेने सुरू केलेल्या ४८ यूपीएचसीमध्ये निःशुल्क रक्त तपासणी केली जात आहे. पॉलिक्लिनिकमध्ये माफक दरात प्रसूती, बालरोग निदान, मानसोपचार, त्वचा रोगावर उपचार केले जाणार आहे. यासाठी बाहेर खाजगी रुग्णालयात किमान पाचशे रुपये खर्च येते. या सुविधा कमी खर्चात होणार असल्याने गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे होणार फायदे

गरिबांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार.

यूपीएचसी तसेच मनपा रुग्णालयांवरचा ताण कमी होणार.

महापालिका भागात वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढणार.

सर्व केंद्रावर आरोग्य कर्मचारी मिळणार.

महापालिकेची वैद्यकीय सुविधा सक्षम होणार.

चार पॉलिक्लिनिकला मंजुरी

राज्य सरकारने शहरात चार पॉलिक्लिकलाही मंजुरी दिली असून ते कपिलनगर, मानेवाडा, केटीनगर, हिवरीनगर येथे उघडण्यात येणार आहे. या पॉलिक्लिनिमध्ये ७ विविध तज्ज्ञ रुग्णांवर उपचार करतील. यात प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, रोगनिदान तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. मानसोपचार तज्ज्ञ, रोग निदान तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ पंधरवड्यातून एकदा तर तपासणी, प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आठवड्यातून एकदा सेवा देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT