Nagpur-Narkhed metro will be connected by rail 
नागपूर

नागपूर-नरखेड मेट्रो रेल्वेने जोडणार; मंत्रिमंडळाची मंजुरी

राजेश चरपे

नागपूर : नागपूर महामेट्रोचा विस्तार नागपूरच्या जवळच्या शहरांना जोडण्यासाठी पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलीत मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेड, भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. यात नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. या दरम्यान ११ स्थानके राहणार आहेत.

नागपूर शहरातून होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २०१८ मध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला होता. परंतु, या करारात अनेक त्रुटी होत्या. केंद्र सरकारच्या संदर्भात असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगीही तत्कालीन सरकारने घेतली नव्हती. या प्रकल्पाला आज रितसर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पात असलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महामेट्रोचे भागभांडवल या प्रकल्पामध्ये राहणार आहे. यासाठी केएफडब्ल्यू या संस्थेकडून कर्ज घेण्याची जबाबदारी व त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आलेली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या शहरातून येणारे व जाणारे अनेक प्रवासी असतात. याचा फायदा नागपूर शहरातील मेट्रोच्या प्रवासी संख्या वाढण्यासाठी सुद्धा होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

असे आहेत टप्पे

हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा २०२१ ते २०३१ या काळात पूर्ण होणार आहे. तर दुसरा टप्पा २०३१ नंतर सुरू होणार आहे. यात नागपूर ते नरखेड हा ८५.५३ किमी, नागपूर-वर्धा ७८.८ किमी, नागपूर-रामटेक ४१.६ व नागपूर-भंडारा रोड हा ६२.७ किलोमीटर रेल्वे मार्गाचा समावेश राहणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT