Nagpur : मोकळे भूखंड झाले तलाव
Nagpur : मोकळे भूखंड झाले तलाव  sakal news
नागपूर

Nagpur : मोकळे भूखंड झाले तलाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भांडेवाडीतील न्यू सुरजनगरात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. पावसाळ्यात या भूखंडामध्ये पाणी साचते. त्यामुळे या भूखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय परिसरातच चिमुकले खेळत असल्याने त्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे.

विकासापासून दूर असलेल्या भांडेवाडी परिसरालगत न्यू सूरजनगर वस्ती आहे. या ठिकाणी गुंतवणूक म्हणून अनेकांनी भूखंड खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, कुठलाच विकास आणि बाजूला असलेल्या डम्पिंग यार्डमुळे जमिनीवर घर बांधून राहण्यासाठी येणे अनेकांनी टाळले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे भूखंड मोकळे पडले आहेत. या मोकळ्या भूखंडांवर पावसाळ्यात पाणी जमा होते. अनेकदा अगदी डंपिंग यार्डचेही पाणी यामध्ये एकत्रित होते. त्यामुळे या भूखंडांना तलावाचे स्वरूप मिळते. तसेच मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. अनेकदा येथून साप आणि किड्यांचाही त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर जाऊ द्यायचे किंवा नाही, असा प्रश्‍न परिसरातील नागरिकांना पडतो.

पाणी साचल्याने मोकळे भूखंड जणू तलाव झाले आहेत. यातील पाणी दूषित असल्याने त्यामुळे परिसरात रोगराई पसरते. त्याचा त्रास नागरिकांना होतो. लोकांचे आरोग्य आणि चिमुकल्यांचाही जीव धोक्यात आला आहे.

- प्रतिक्षा भुरे

मोकळ्या भूखंडावरील पाणी रस्त्यांवर येत असल्याने सर्वत्र चिखल होतो. रस्त्यावरून चालणे मुश्‍कील होते. कित्येकदा अंधारात या अनेकजण पडले आहेत. प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

- इम्रान शेख

मोकळ्या भूखंडाबाबत प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतल्या जात नाही. नगरसेवक केवळ मत मागण्यासाठी येतात. मात्र, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

- विशाखा खोब्रागडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT