नागपूर

Nagpur News : पोलिसांवर रोखले पिस्तूल, आरोपी फरार

अजनीतील घटना सहा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीतील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंडांनी पिस्तूल रोखून फरार झाले. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास सह्याद्री लॉनसमोरील अविनाश सावजी भोजनालयात घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी अक्षय नागेश पाटील (रा.इंदिरानगर), बाला ,राहुल व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरातील बीट मार्शल मनोहर काशीनाथ मुलमुले (वय ४३) व शिपाई राहुल हे गुरुवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी मनोहर यांना अविनाश सावजी भोजनालयात काही जण ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी सहकाऱ्यासह सावजी भोजनालयात छापा टाकला. तेव्हा अक्षय नागेश पाटील (रा.इंदिरानगर), बाला ,राहुल व त्याच्या तीन साथीदार तिथे बसले होते. त्यांना बघताच, सहाही जण उठले आणि पळू लागले. त्यापैकी दोघांना त्यांनी पकडून त्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडे पिस्तूल आढळले.

दोघांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. त्यात आरोपीने पिस्तूल हिसकावत मनोहर यांच्या दिशेने पिस्तूल रोखून धरले आणि ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व जण दोन मोटारसायकलने पसार झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. राहुल हा कुख्यात असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT