Nagpur out, Chandrapur Inn, screen on the talk screen 
नागपूर

नागपूर आऊट, चंद्रपूर इन, चर्चेवर पडला पडदा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या वारीचा मान विदर्भातून चंद्रपूरला मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नागपूर शहराची या संमेलनातून "एक्‍झिट' झाली, हे निश्‍चित. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पत्रकार परिषद मुंबईत आज पार पडली. विदर्भातील काळ्या हिऱ्याची खाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूर शहरात या वारीचा 5 ते 7 जूनदरम्यान अंतिम टप्पा असणार आहे, तसे संकेत परिषदेतून मिळाले.

"दै. सकाळ'ने वृत्त मालिका प्रसिद्ध करून या नाट्याकडे वेळोवेळी नागपूरकर नाट्यप्रेमींचे लक्ष वेधले. अशातच आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर "पडदा' पडला. विदर्भाच्या आयोजनाबाबत नाट्य परिषद काय निर्णय घेते? याबाबत प्रत्येकाला कुतूहल होते. नागपूरला संमेलनातून डावलले जात असल्याची बाब "दै. सकाळ'च्या वृत्तातून नाट्यप्रेमींना वेळोवेळी कळत गेली. सोशल मीडियाचा आधार घेत अनेकांनी यावर खंतदेखील व्यक्‍त केली. तर काहींनी विरोध दर्शवला.
मात्र, चंद्रपूर शहराच्या रूपाने विदर्भाच्या वाट्याला फूल ना फुलाची पाकळी प्राप्त होत आहे, यातच विदर्भातील नाट्यप्रेमींना समाधान मानावे लागणार आहे. वारीच्या आयोजनाचा मान चंद्रपूरकरांनी स्वीकारल्याची चर्चा "बॅकस्टेजला' सुरू आहे. चंद्रपूरच्या नाट्यवर्तुळात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. आयोजनाबाबत विचारणा केली असता चंद्रपुरातील रंगकर्मींनी नाट्य परिषदेला होकाराची घंटा वाजविल्याची प्राथमिक माहिती आहे. तरी आयोजनाचा अंतिम "ड्राफ्ट' तयार नसल्याची स्पष्टोक्ती चंद्रपुरातील रंगकर्मींनी दिली. इकडे नागपुरातील रंगकर्मींमध्ये खदखद आहे. गेल्यावर्षी मोठा आदबिने मिरवलेल्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना यंदा प्रेक्षक म्हणून राहावे लागणार आहे. त्यामुळे, काहींना खंत वाटते; तर, काहींनी केवळ दोष देण्यातच धन्यता मानली.

विदर्भातील स्थळ "पडद्याआड'च

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पत्रकार परिषदेत नाट्य संमेलनाच्या वारीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. यात विदर्भात 5 ते 7 जूनदरम्यान वारीचे आगमन होत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, स्थळ पडद्याआड ठेवले. त्यामुळे नाट्य परिषदेचे "विंगेआड' कशाचे नियोजन सुरू आहे, हा प्रश्‍न कलावंतांसह नाट्य वर्तुळासमोर आहे.

तर चार तालुक्‍यांत नाट्यप्रयोग

वारीचा मान विदर्भातून चंद्रपूरला मिळाल्यास शहर व चार तालुक्‍यांमध्ये नाट्यप्रयोग होतील. त्यामुळे चंद्रपूरकरांसोबतच झाडीपट्टीच्या रंगकर्मींना संमेलनाचा आनंद घेता येईल. नागपूर, अमरावतीप्रमाणे चंद्रपुरात नाट्य परिषदेची स्वतंत्र शाखा नाही. त्यामुळे चंद्रपूरला आयोजन समितीची स्थापना करीत संपूर्ण आयोजन करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT