Nagpur  Esakal
नागपूर

Government School Uniform: सरकारी शाळांना आता एकाच रंगाचा ड्रेस कोड, या दिवसापासून होणार अंमलबजावणी

राज्य शासनाने एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे. आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट यासाठी मान्यता दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ZP School Same Uniform Dress Code: राज्य शासनाने एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे. आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट यासाठी मान्यता दिली आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ या वर्षात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या प्राथमिक शाळांमध्ये नवा

गणवेश दिला असून, अन्य शाळांनाही यापुढे अशाच प्रकारचा गणवेशाचा पॅटर्न राबवावा लागणार आहे. शैक्षणिक वर्ष संपत येत असल्याने पुढील शैक्षणिक सत्रापासून या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी या निर्णयामुळे एकाच गणवेशात दिसणार आहेत. तथापि, हे गणवेश वेळेत मिळावे, अशी मागणी देखील होत आहे. यात पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलीकरिता आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा याचे एकत्रित असलेले स्वरूप म्हणजे पिनो फ्रॉक असा पॅटर्न राहणार आहे.

पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलींना शर्ट व स्कर्ट अशा प्रकारचा गणवेश राहणार आहे. तसेच आठवीतील मुलींसाठी आकाशी रंगाचा कुर्ता व गडद निळ्या रंगाची सलवार असा पॅटर्न असून त्यावर निळ्या रंगाची ओढणी असणार आहे.पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पँट असा गणवेश असेल.

तसेच आठवीतील मुलांसाठी फूल पँट व हाफ शर्ट ही गणवेश रचना असून सर्व विद्यार्थ्यांच्या शर्टवर शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट असा गणवेश देण्यात येणार आहे. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनाही याच प्रकारचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

एकाच रंगाचे दोन गणवेश देणार

राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत समग्र शिक्षा अभियानामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचे दोन गणवेश दिले जाणार आहेत. या गणवेशाची रचनाही निश्चित केली आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून या योजनेची अंमलबजावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

IPL 2026 Auction : १९ वर्षीय आयुष, कार्तिक, २०चा प्रशांत वीर, २२ वर्षांचा ब्रेव्हिस; पण ४५ वर्षांचा MS Dhoni 'धुरंधर'; Memes व्हायरल

Achievers Of 2025: 'या' भारतीय कलाकारांनी बदलली मनोरंजनाची व्याख्या; त्यांच्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत लढविणार पन्नास जागा

SCROLL FOR NEXT